शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

‘ऑपरेशन अजय’ : युद्धात अडकलेले भारताकडे निघाले; प्रवासाचा खर्च सरकार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 06:49 IST

या विमान प्रवासासाठी कोणतेही प्रवास शुल्क आकारण्यात येणार नाही. केंद्र सरकार हा सर्व खर्च उचलणार आहे.

जेरुसलेम : भारत सरकारने इस्रायल युद्धभूमीत अडकलेल्या १८ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. या अंतर्गत पहिले विशेष विमान गुरुवारी संध्याकाळी बेन गुरियन विमानतळावरून रात्री ९ वाजता २३० प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे. हे विमान शुक्रवारी सकाळी भारतात पोहचेल. या विमान प्रवासासाठी कोणतेही प्रवास शुल्क आकारण्यात येणार नाही. केंद्र सरकार हा सर्व खर्च उचलणार आहे.

तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने युद्धादरम्यान भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते भारतीय कंपन्यांसोबत ऑनलाइन बैठका घेत आहेत, ई-मेलद्वारे भारतातील विमानांची माहिती पाठवत आहेत, भारतीय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन देत आहेत आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत. 

येथे भारतीय परिचारिकांची संख्या सर्वाधिक आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले. इस्रायलने हमासपाठोपाठ सीरियावरही हल्ला केल्याने युद्धाचा भडका आणखी वाढण्याची भीती आहे. इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळांच्या रनवेचे नुकसान झाले आहे. हा हल्ला नेमका का केला याबाबत इस्रायलने माहिती दिलेली नाही.

१८,००० भारतीय इस्रायलमध्ये राहतात. यात परिचारिका, विद्यार्थी, अनेक आयटी व्यावसायिक आणि हिरे व्यापारी यांचा समावेश आहे.

घमासान युद्ध सुरू असलेल्या इस्रायलमधून अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान भारताकडे रवाना होण्यापूर्वी विमानतळावर झालेली गर्दी. ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत भारत सरकार ही मोहीम राबवत आहे.  

विमानतळावर रांगाविमानात चढण्यासाठी भारतीयांची लांबच लांब रांग विमानतळावर होती. भारतीय दूतावासाकडून योग्य सूचना देण्यात आल्या, त्यामुळे आमचे मनोबल वाढले, असे इस्रायलमधील विद्यार्थी शुभम कुमार याने सांगितले.

जमिनीवरून हल्ल्यासाठी  हवा फक्त एक आदेशहमास या दहशतवादी संघटनेचे प्रमुख केंद्र असलेल्या गाझावर जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी पूर्ण झाली असून, आता केवळ प्रमुख नेत्यांनी आदेश देण्याचा बाकी असल्याचे इस्रायलचे लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेच यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, इस्रायलने सुमारे ३,६०,००० राखीव सैन्य २३ लाख लोक राहत असलेल्या गाझा सीमेवर तैनात केले आहे. हमासने केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा बदला म्हणून लवकरच कारवाई करण्याचा इशारा इस्रायलने दिला आहे.

१२०० - गाझामध्ये मृत्यू१३०० - इस्रायलमध्ये मृत्यू१५०० - हमासचे दहशतवादी ठार 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायलIndiaभारत