मुक्त विद्यापीठ (सीडी बातमी जोड)

By Admin | Updated: March 21, 2015 00:23 IST2015-03-20T22:39:34+5:302015-03-21T00:23:47+5:30

अरुण साधू यांनी मनोगत व्यक्त करताना काही दिवसांपूर्वी झालेल्या भालचंद्र नेमाडे व सलमान रश्दी यांच्या वादात उडी घेतली. पाश्चात्त्य प्रकाशक व वाचकांना केवळ दरिद्री, बकाल भारताचे चित्रण करणारे इंग्रजी साहित्यच आवडते आणि अशाच प्रकारच्या साहित्याला आवर्जून प्रसिद्धी दिली जाते. भारतातील मध्यमवर्गीय समाजाचे चित्रण करणारे साहित्य मात्र नाकारले जाते, असा आरोप त्यांनी केला. नेमाडे यांनी रश्दींना उत्तर दिले, हे चांगलेच झाले, असेही ते म्हणाले. याशिवाय देशातील प्रादेशिक भाषांतील आदानप्रदान पूर्णत: थांबले असल्याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली.

Open University (CD News Attachment) | मुक्त विद्यापीठ (सीडी बातमी जोड)

मुक्त विद्यापीठ (सीडी बातमी जोड)

अरुण साधू यांनी मनोगत व्यक्त करताना काही दिवसांपूर्वी झालेल्या भालचंद्र नेमाडे व सलमान रश्दी यांच्या वादात उडी घेतली. पाश्चात्त्य प्रकाशक व वाचकांना केवळ दरिद्री, बकाल भारताचे चित्रण करणारे इंग्रजी साहित्यच आवडते आणि अशाच प्रकारच्या साहित्याला आवर्जून प्रसिद्धी दिली जाते. भारतातील मध्यमवर्गीय समाजाचे चित्रण करणारे साहित्य मात्र नाकारले जाते, असा आरोप त्यांनी केला. नेमाडे यांनी रश्दींना उत्तर दिले, हे चांगलेच झाले, असेही ते म्हणाले. याशिवाय देशातील प्रादेशिक भाषांतील आदानप्रदान पूर्णत: थांबले असल्याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. साळुंखे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी स्वागत केले. माधवी धारणकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. माधुरी सोनवणे, डॉ. मधुकर शेवाळे, विजया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नागार्जुन वाडेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.

फोटो आहे : २० पीएचएमआर १०६
कॅप्शन : नागालॅँड येथील साहित्यिक तेमसुला आओ यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करताना अरुण साधू. समवेत पंडित गवळी, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. जगदीश अरोरा.

Web Title: Open University (CD News Attachment)