शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यात फक्त तीन तक्रारी

By admin | Updated: November 19, 2015 00:10 IST

व्हॉटस् ॲप तक्रारीला प्रतिसादच नाही: नियंत्रण कक्षाच्या सीआरओंकडे आहे स्मार्ट फोन

व्हॉटस् ॲप तक्रारीला प्रतिसादच नाही: नियंत्रण कक्षाच्या सीआरओंकडे आहे स्मार्ट फोन
जळगाव: सीसीटीएनएसच्या माध्यमातून जिल्‘ातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मोठा गाजावाजा करून ऑगस्ट महिन्यात नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत जिल्हा नियंत्रण कक्षात स्मार्ट फोनच्या माध्यमातून व्हॉटस् ॲपवर तक्रारींची सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र नागरिकांचा प्रतिसाद न मिळणे असो की ही यंत्रणा हाताळण्यात उदासिनता यामुळे चार महिन्यात फक्त तीनच तक्रारी दाखल झाल्या.
सावदा येथील एका नागरिकाने फैजपूर उपअधीक्षकांच्या बाबतीत तर जळगाव शहरातील मेहरुण तलावात कार बुडाल्याचा संदेश प्राप्त झाला होता. तसेच जळगाव शहरातील आणखी एक तक्रार दाखल झाली होती. गेल्या तीन दिवसापासून पोलीस महासंचालकांच्या नावाने राज्यातील नियंत्रण कक्षाचे व्हॉटस् ॲप क्रमांक सोशल मीडियावर फिरत आहेत. जिल्‘ात त्याची अंमलबजावणी चार महिन्याआधीच सुरू झाली आहे.

अशी आहे संकल्पना
कायदा व सुव्यवस्था असो अथवा अन्य पोलीस व जनतेला संदेश द्यायचा असेल तर पोलीस अधीक्षक हे नियंत्रण कक्षात सीआरओंना संदेश पाठवतील. तेथून हा संदेश जिल्‘ातील सर्व अपर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांच्या मोबाईलवर जाईल. ते प्रभारी अधिकारी आपआपल्या कार्यक्षेत्रातील बीट प्रमुखाला संदेश फॉरवर्ड करतील. त्यानंतर बीट प्रमुख त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटलांना हा संदेश देतील व पोलीस पाटील हा संदेश जनतेपर्यंत पोहचवतील.एखाद्या गावात काही गैरप्रकार, वादविवाद व कायदा सुव्यवस्था धोक्यात येवू शकते असा प्रकार घडल्यास पोलीस पाटील तो संदेश त्याच पध्दतीने बीट अंमलदाराकडे पाठवेल. तेथून टप्प्याटप्प्याने काही मिनिटातच हा संदेश थेट नियंत्रण कक्ष व पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचेल. जिल्‘ातील सामान्य नागरिक त्याची तक्रार या व्हॉटस् अप क्रमांकावर करू शकतो.