शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

बंदरांवर निर्यातीच्या प्रतीक्षेत असलेल्या 100 कोटींच्या कांद्याचं काय करायचं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 5:27 PM

केवळ कस्टम्सकडे सोपविलेल्या कांद्याच्या निर्यातीसच मुभा

- योगेश बिडवईमुंबई : केंद्र सरकारने १४ सप्टेंबरपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी ज्या निर्यातदरांनी त्या दिवसापर्यंत निर्यात करण्याचे त्यांचे कांद्याचे साठे बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केले होते त्यांना ही बंदी लागू होणार नाही, असे विदेश व्यापार महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे. मात्र बंदरांवर निर्यातीसाठी कंटेनरमध्ये भरून तयार असलेला व बांगलादेश आणि नेपाळ सीमेवर उभे असलेले ट्रक यांच्यातील तब्बल 35 हजार टन म्हणजे 100 कोटींच्या कांद्याचे काय करायचे, असा प्रश्न निर्यातदारांनी मोदी सरकारला विचारला आहे. 

नेपाळ, बांगलादेश सीमेवर कस्टम्सकडे सोपविलेल्या कांद्याच्या निर्यातीचा मार्गही  मोकळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र तेथेही कस्टम्सकडे न सोपविलेला कोट्यवधींचा कांदा आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदरावर तब्बल 350 कांद्याचे कंटेनर उभे आहेत. त्यातील बराचसा माल कस्टम्सकडे सोपविलेला नाही. त्याचेही काय करायचे, असा प्रश्न आहे. तो माल निर्यात न झाल्यास कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. त्याचा फटका शेवटी देशातील भाव पडून शेतकऱ्यांना बसेल. 

निर्यातबंदीची अधिसूचना प्रसिद्द झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी केंद्रीय सीमाशुल्क मंडळाने (सेंट्रल कस्टम्स बोर्ड) यासंबंधी खुलासा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार खुलासा करणारा ई-मेल निर्यात व्यापार महासंचालनालयातील एक उप महासंचालक (निर्यात) नितिश सुरी यांनी कस्टम्स बोर्डास शुक्रवारी पाठविला आहे. त्यात मालाच्या निर्यातीची तारीख कोणती धरावी यासंबंधीच्या नियमाचा हवाला देऊन असे नमूद करण्यात आले की, ज्यावेळी धोरणात केलेला बदल निर्यातदारांना प्रतिकूल असेल तेव्हा हे सुधारित धोरण, ज्यांनी सुधारित अधिसूचना निघण्याच्या तारखेपर्यंत आपला निर्यातीचा माल बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केला आहे, त्यांना लागू होणार नाही. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणारी अधिसूचना ज्या तारखेला प्रसिद्ध झाली तोपर्यंत वरीलप्रमाणे बंदरांमध्ये आणून कस्टम्सकडे सुपूर्द केलेला कांदा हा ‘निर्यातीच्या प्रक्रियेत असलेला माल’ ठरत असल्याने अशा कांद्याला ही निर्यातबंदी लागू होणार नाही.त्यामुळे कस्टम्स मंडळाने बंदरांमधील त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना अशा प्रकारे निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या कांद्याच्या निर्यातीस आडकाठी करू नये, असेही विदेश व्यापार संचालनालयाला कळविले आहे.बंदरांवर अडकलेल्या 35 हजार टन कांद्याच्या निर्यातीचे काय? मुंबई बंदरावर 350 कंटेनर सोमवारपासून थांबले आहेत. दक्षिणेत बंदरांवर 100 कंटेनर, सीमेवर सुमारे 200 ट्रक कांदा निर्यातबंदीमुळे अडकला होता. हा सुमारे 35 हजार टन म्हणजे 100 कोटींचा कांदा आहे. तो सर्व निर्यात होतो का, हे पाहावे लागेल. - अजित शाह, अध्यक्ष, अखिल भारतीय कांदा निर्यातदार संघटना

टॅग्स :onionकांदा