कांदा विकणारा बनला 100 कोटींचा मालक; 'असा' अडकवायचा जाळ्यात, अखेर झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 03:14 PM2024-02-17T15:14:14+5:302024-02-17T15:22:04+5:30

10 वर्षांपूर्वी बाजारात कांद्याचे कमिशन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, पण नंतर असं काही घडलं की, कांद्याचे तुटपुंजे कमिशन घेणारा हा कोट्यवधींचा मालक बनला.

onion dealer became owner of more than rs 100 crore police exposed the fraud | कांदा विकणारा बनला 100 कोटींचा मालक; 'असा' अडकवायचा जाळ्यात, अखेर झाला पर्दाफाश

कांदा विकणारा बनला 100 कोटींचा मालक; 'असा' अडकवायचा जाळ्यात, अखेर झाला पर्दाफाश

उत्तर प्रदेशमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे, बुलंदशहर जिल्ह्यात 10 वर्षांपूर्वी बाजारातील कांदे विकणारा दलाल 100 कोटींहून अधिक रुपयांचा मालक बनला. 10 वर्षांपूर्वी तो बाजारात कांद्याचे कमिशन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, पण नंतर असं काही घडलं की, कांद्याचे तुटपुंजे कमिशन घेणारा हा कोट्यवधींचा मालक बनला. त्याने 10 वर्षांत 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता बेकायदेशीरपणे मिळवली. 

पैसे मिळवताना सुधीर गोयल याने शेतकऱ्यांची, अनेक लोकांची फसवणूकही केली. यासोबतच त्याने सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही आपल्या जाळ्यात अडकवलं. चांगल्या ठिकाणी प्लॉट व घरं दाखवून लोकांची फसवणूक केली. एका व्यक्तीला फसवणुकीचा हा प्रकार कळताच त्याने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली, तेव्हाच सत्य समोर आलं.

पोलिसांनी सुधीर गोयलविरोधात अनेक अधिक गुन्हे दाखल केले आहेत, तर 100 हून अधिक प्रकरणांचा तपास सुरू आहे. 10 वर्षांपूर्वी बाजारात कांद्यामध्ये एजंट म्हणून काम करणारा अवघ्या 10 वर्षांत 100 कोटींहून अधिक मालमत्तेचा मालक बनला. फसवणूक झालेले काही लोक अजूनही पोलिसांकडे तक्रार करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी अनुकृती शर्मा यांनी 16 डिसेंबर रोजी या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीसह 5 जणांना अटक करून जेलमध्ये पाठवलं. सध्या हा सुधीर गोयल, पत्नी राखी गोयल आणि अन्य तीन साथीदार तुरुंगात आहेत, तर ईडी याप्रकरणी सुधीर आणि त्याच्या साथीदारांविरोधातही चौकशी करत असून आतापर्यंत ईडीने बुलंदशहरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
 

Web Title: onion dealer became owner of more than rs 100 crore police exposed the fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.