शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत एक हजार सशस्त्र पोलीस तैनात- गृहमंत्री अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 02:02 IST

आमदार - पोलिसांत समन्वय साधणार; शांतता समित्यांची गरज

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हजार सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून, आंतरराज्य सीमारेषेवर लक्ष ठेवले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.दिल्लीच्या ईशान्य भागात सोमवारी सुरू झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर शहा यांच्या उपस्थितीत नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला, काँग्रेस नेते सुभाष चोप्रा, भाजपचे मनोज तिवारी, रामवीर बिदुडी, दिल्ली विधानसभेतील सर्व आमदार उपस्थित होते. पोलीस आणि आमदारांमध्ये समन्वय साधून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. त्याचप्रमाणे समजातील सर्व घटकांचा समावेश असलेल्या शांतता समित्या स्थापन करण्याची गरज असल्याचेही शहा म्हणाले.हिंसाचार झालेल्या भागात पोलीस कर्मचाऱ्यासह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांच्या सीमारेषांवर लक्ष ठेवले जात आहे. वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी सर्वेतोपरी प्रयत्न केले. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हिंसाचार सुरू असताना अफवा रोखण्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. दिल्लीकर आणि प्रसारमाध्यमांनी अफवा रोखण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे.शांततेची सुनिश्चिती करा : अमित शहास्थानिक प्रतिनिधींनी तातडीने संवेदनशील भागांत बैठका घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.सर्वांनी राजकारण बाजूला ठेऊन या परिस्थितीत एकत्र येण्याची गरज आहे. नेत्यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.हिंसाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकी दाखवल्याने शहा यांनी हे सकारात्मक चित्र असल्याचे म्हटले आहे.सर्वपक्षीयांनी शांततेसाठी प्रयत्न करावेत आणि हिंसाग्रस्त भागात परिस्थिती नियंत्रणात असल्याची निश्चिती करावी, असेही शहा म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहा