शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
5
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
6
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
7
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
8
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
9
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
10
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
11
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
12
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
13
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
14
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
15
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
16
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
17
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
18
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
19
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीर : सोपोरमध्ये जवानांनी एका दहशतवाद्याचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 12:27 IST

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

श्रीनगर, दि. 9 -  उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसराला घेराव घालत तेथे शोधमोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या भ्याड हल्ल्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.  दरम्यान, परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असून ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात येत असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. 

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर यासीन इटूचा एन्काऊंटर12 ऑगस्ट :दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशवादी संघटनेचा कमांडर यासीन इटू उर्फ गजनवीचा जवानांनी खात्मा केला. यासीन इटूचा खात्मा म्हणजे दहशतवादी संघटनांना मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या चकमकीत महाराष्ट्रातील एका जवानासह दोन जवान शहीद झाले होते. अकोल्यातील जवान सुमेध गवई आणि तामिळनाडूतील जवान इलयाराजा पी यांना वीरमरण आले.  

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार

4 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी ठार मारला गेला. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला.  एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली.  मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले. यानंतर एन्काऊंटरमध्ये एका बाईकस्वाराला ठार करण्यात आले. ठार करण्यात आलेला व्यक्ती हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता, असे पोलिसांनी सांगितले. या दहशतवाद्याकडून रायफल,  चिनी हॅण्ड ग्रेनेडसहीत अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत 3 राष्ट्रीय रायफल्सचे एक जवान जखमी झाला आहे.   दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद3 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील शोपियान व कुलगाम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचं नाव आकिब असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शोपियानमध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यात एक मेजर व दोन जवान शहीद झाले आहेत.   दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीननं शोपियान हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. यात अल्ताफ खुचरू सामिल होता, असे वृत्त समोर आले आहे. तो टॉप हिजबुल कमांडर असल्याचे बोलले जात आहे. 

लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मा1 ऑगस्ट रोजी भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerror Attackदहशतवादी हल्ला