एक चूक अन् होत्याचं नव्हतं झालं! घरात मच्छर क्वाइल लावून विसरलात? 'ही' घटना ऐकून अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:38 IST2026-02-28T12:35:36+5:302026-02-28T12:38:38+5:30

घरात लावलेल्या मच्छर क्वाइलमुळे लागलेल्या आगीत एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला.

One mistake and it was gone! Forgot to put mosquito coils in the house? You will be shocked to hear 'this' incident | एक चूक अन् होत्याचं नव्हतं झालं! घरात मच्छर क्वाइल लावून विसरलात? 'ही' घटना ऐकून अंगावर येईल काटा

AI Generated Image

बिहारची राजधानी पाटणा येथील करबिगहिया परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. घरात लावलेल्या मच्छर क्वाइलमुळे लागलेल्या आगीत एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. मालती देवी असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, अर्धांगवायूमुळे त्या जागेवरून हलूसुद्धा शकल्या नाहीत. आपल्या पत्नीला आगीच्या विळख्यात अडकलेले पाहून ७५ वर्षीय पती ओरडत राहिला, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते.

नेमकं काय घडलं?

ही घटना शुक्रवारी संध्याकाळी करबिगहिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मालती देवी घराच्या बाल्कनीत झोपल्या होत्या. डास पळवण्यासाठी तिथे मच्छर क्वाइल लावण्यात आला होता. याच क्वाइलच्या ठिणगीने जवळच असलेल्या कपड्यांना किंवा अंथरुणाला पेट घेतला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.

शारीरिक लाचारी आणि मृत्यूचा विळखा

मालती देवी आणि त्यांचे ७५ वर्षीय पती बलीराम चौधरी हे दोघेही अर्धांगवायूने आजारी आहेत. मालती देवींची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नव्हत्या. आग लागल्यावर त्यांनी वाचण्यासाठी धडपड केली, पण शरीर साथ देत नव्हते. शेजारीच असलेल्या बलीराम यांनी पत्नीला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, मात्र स्वतःलाही हालचाल करता येत नसल्याने ते असहाय्य झाले होते. पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात बलीराम हे देखील गंभीररीत्या भाजले आहेत.

मुलगा गेला होता बाजारात, घरात कोणीच नव्हते...

घटनेच्या वेळी घरात मदतीला कोणीही नसल्याने हा अनर्थ ओढवला. मालती देवी यांचा लहान मुलगा रविशंकर चौधरी आपल्या पत्नी आणि मुलांसह काही खरेदी करण्यासाठी बाजारात गेला होता. घराबाहेरून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा निघताना पाहून शेजाऱ्यांनी धाव घेतली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. मालती देवी यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शारीरिकदृष्ट्या अक्षम आणि वृद्ध व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मच्छर क्वाइलसारख्या साध्या गोष्टीकडे केलेले दुर्लक्ष किती जीवावर बेतू शकते, याचे हे दाहक उदाहरण ठरले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : मच्छर क्वाइल की लापरवाही: दर्दनाक आग में बुजुर्ग महिला की मौत

Web Summary : पटना में, मच्छर क्वाइल से घर में आग लगने से 65 वर्षीय महिला की मौत हो गई। लकवा के कारण चलने में असमर्थ, वह फंस गई, जबकि उसके पति, जो लकवाग्रस्त थे, असहाय होकर देखते रहे। यह घटना सुरक्षा सावधानियों की उपेक्षा के खतरों को उजागर करती है।

Web Title : Mosquito coil negligence: Elderly woman dies in tragic fire accident.

Web Summary : In Patna, a 65-year-old woman died after a mosquito coil ignited a fire in her home. Unable to move due to paralysis, she was trapped while her husband, also paralyzed, could only watch helplessly. The incident highlights the dangers of neglecting safety precautions.