शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Oxygen पुरवठ्यावर पंतप्रधानांचा मोठा निर्णय; PM Cares Fund मधून खरेदी केले जाणार एक लाख कंन्सन्ट्रेटर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 5:52 PM

Coronavirus In India : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश.

ठळक मुद्देपंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय.पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश.

देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अनेक ठिकाणी औषध आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, ऑक्सिजनच्या कमतरतेकडे पाहता पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी पीएम केयर्स फंडातून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. बुधवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका उच्च स्तरीय बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव झालेल्या राज्यांना यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे.  या बैठकीत पीएम केयर्स फंड अंतर्गत यापूर्वीच मंजुरी दिलेल्या ७१३ PSA प्लान्टपैकी ५०० नव्या ऑक्सिजन प्लांट्सनाही मंजुरी देण्यात आली आहे. पीएम केयर्स फंडद्वारे ५०० नवे ऑक्सिजन प्लांट उभारले जातील आणि त्यात ऑक्सिजनचं उत्पादन लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्नही केले जातील. हे प्लांट जिल्हा मुख्यालय आणि टिअर २ शहरांच्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतील. हे प्लांट DRDO आणि CSIR द्वारे विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्थापन केले जातील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतOxygen Cylinderऑक्सिजनNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान