शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत एक लाख शेतकरी जमणार, किसान युनियनची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 9:51 AM

29 नोव्हेंबर रोजी संसदेकडे ट्रॅक्टर रॅली निघणार आहे, यात शेकडो शेतकरी सहभागी होऊ शकतात.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करुनही शेतकरी संघटना त्यांच्या 'चलो दिल्ली' कार्यक्रमावर ठाम आहेत. 26 नोव्हेंबर रोजी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शेतकर्‍यांना एकत्र येण्यास सांगण्यात येत आहे, जेणेकरून 29 नोव्हेंबर रोजी संसदेकडे निघणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉली मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतील. 

शेतकरी संघटनांच्या या आवाहनानंतर मोठ्या संख्येने शेतकरी राजधानीच्या सीमेवर पोहोचू लागले आहेत. पंजाबमध्ये, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी विविध कृषी संघटनांकडून बैठका आयोजित केल्या जात आहेत. सिंघू, टिकरी सीमा आणि बहादूरगड येथे मोठ्या संख्येने शेतकरी येण्याची शक्यता असून, त्यासाठी तयारी सुरू आहे. जोपर्यंत हे कायदे संसदेत औपचारिकपणे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन संपवून मागे हटणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा ओघ सुरूच राहणार आहे.

10 एकरपेक्षा मोठे मैदान तयार केले जात आहे

भारतीय किसान युनियनने मोठ्या संख्येने शेतकरी येण्याचा दावा केला आहे. त्यासाठी मोठा मंडपही टाकला जातोय. संस्थेचे सचिव शिंगारा सिंग म्हणाले, 10 एकरपेक्षा जास्त मोठी खुली जागेत हा मंडप टाकला जात आहे. या ठिकाणी हे सर्वशेतकरी एकत्र जमतील. तसेच, आंदोलनाच्या जुन्या जागेवर उभारण्यात आलेल्या शेडचा उपयोग शेतकऱ्यांना रात्री झोपण्यासाठी केला जाणार आहे. 26 नोव्हेंबरला येथे एक लाखाहून अधिक लोक पोहोचतील अशी आमची अपेक्षा आहे.

आगामी हिवाळी अधिवेशनात संसदेकडे प्रस्तावित ट्रॅक्टर मोर्चाबाबत शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, 29 नोव्हेंबर रोजी शेतकरी संसदेपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. शेतकरी संघटनांची संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चा(SKM) ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 500 शेतकरी संसदेत पोहोचतील. सरकारने खुले केलेल्या रस्त्यावरुन शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे. रस्ता रोको करण्याचा आपला हेतू नसून सरकारशी चर्चा करण्याचा आहे, असे ते म्हणाले.

आज मंत्रिमंडळाची बैठकीत मंजुरी मिळू शकते

आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. तत्पूर्वी, कृषी कायदे परत करण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, हे कायदे त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहेत हे शेतकऱ्यांना पटवून देण्यात ते अपयशी ठरले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणले होत, पण आता देशहितासाठी मागे घ्यावे लागत आहेत. यासोबतच सरकारने शेतकऱ्यांच्या उर्वरित मागण्याही मान्य करणार असल्याचे म्हटले आहे.

 

टॅग्स :delhiदिल्लीFarmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च