शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

दीड लाख टपाल कार्यालये टीसीएसने केली आधुनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 2:54 AM

इंटिग्रेटेड ईआरपी सोल्युशनच्या माध्यमातून अत्यंत दूरवरील भागाशी संपर्क

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी माहिती व तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) देशातील १.५ लाख टपाल कार्यालयांच्या (इंडिया पोस्ट) आधुनिकीकरणासाठी इंटिग्रेटेड सोल्युशन तैनात केले आहे. २०१३ मध्ये टीसीएसने टपाल विभागाकडून १,१०० कोटी रुपयांचा अनेक वर्षे चालणारा करार माहिती व तंत्रज्ञान आधुनिकीकरणासाठी मिळवल्याचे जाहीर केले होते.हे आधुनिकीकरण टीसीएस इतर कोणत्याही कंपनीकडून सेवा न घेता झाले आहे. या भागीदारीचा हेतू पोस्टाला अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त करून ग्राहकांना कार्यक्षम सेवा देण्याचा आहे. या रूपांतरणात कोअर सिस्टीम इंटिग्रेशन कार्यक्रम टीसीएसने डिझाईन करून राबवला आहे. यात इंटिग्रेटेड ईआरपी सोल्युशन आहे. त्याद्वारे मेल ऑपरेशन्स, फायनान्स आणि अकाऊंटिंग, एचआर फंक्शन्स करता येतील व दीड लाखांपेक्षा जास्त संख्येत असलेल्या टपाल कार्यालयांना प्रचंड नेटवर्कशी जोडले गेले. यामुळे ही टपालसेवा सर्वात मोठी ई-पोस्टल नेटवर्क असलेली बनेल, असे टीसीएसने निवेदनात म्हटले.टीसीएसने म्हटले आहे की, आम्ही आमच्या पॉइंट ऑफ सोल्युशनची (पीओएस) अंमलबजावणी २४ हजार टपाल कार्यालयांत ८० हजार पीओएस टर्मिनलने केली असून, कन्साईनमेंट ट्रॅकिंग कॅपॅबिलिटीजने वेब पोर्टलही तसेच मल्टी लिंग्वल कॉल सेंटर ग्राहकांसाठी उभारले आहेत. या रूपांतरणाचा महत्त्वाचा हेतू हा देशभर पसरलेल्या टपाल कार्यालयाचा उपयोग आर्थिक व्यवहारात लोकांना सामावून घेणे आणि अतिशय दूरच्या भागांत सेवा पोहोचवण्याचा आहे. हे काम १.३ लाख दर्पण १ उपकरणाद्वारे केले जाईल. हे उपकरण हातात मावणारे असून, ग्रामीण डाक सेवक ते टपाल, बँकिंग, विमा सेवा आणि अत्यंत दूरवरील खेड्यांत रोख देण्यासाठी करतील व यासाठी नेटवर्क कनेक्टिव्हिटीची गरज नसेल, असे टीसीएसने म्हटले.इंटिग्रेटेड सोल्युशनला पाच लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची गरज आहे, एकाच वेळी ४० हजार वापरकर्त्यांना सेवा मिळतील आणि तीन दशलक्ष टपाल व्यवहारांची प्रक्रिया केली जाईल व त्याद्वारे ही जगातील एक मोठी सॅप (एसएपी) राबवणारी ठरेल, असेही त्यात म्हटले आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस