नॅशनल स्पेस डे: योगी सरकारने १.४८ कोटी विद्यार्थ्यांना घडवली अंतराळाची डिजिटल सफर, भारताच्या मोहिमांविषयी मुलांमध्ये कुतूहल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:07 IST2025-08-26T11:37:28+5:302025-08-26T12:07:07+5:30

योगी सरकारने नवीन उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाविषयी गोडी निर्माण करुन कोट्यवधि विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाशी जोडले

On the occasion of National Space Day Yogi Government gave information about space to 1.48 crore children of 1.32 lakh council schools | नॅशनल स्पेस डे: योगी सरकारने १.४८ कोटी विद्यार्थ्यांना घडवली अंतराळाची डिजिटल सफर, भारताच्या मोहिमांविषयी मुलांमध्ये कुतूहल

नॅशनल स्पेस डे: योगी सरकारने १.४८ कोटी विद्यार्थ्यांना घडवली अंतराळाची डिजिटल सफर, भारताच्या मोहिमांविषयी मुलांमध्ये कुतूहल

National Space Day: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या पुढाकाराने राज्यातील १.३२ लाख शाळांमध्ये 'राष्ट्रीय अंतराळ दिन' साजरा करण्यात आला. यावेळी मुलांना भारताने आतपर्यंत अंतराळात केलेल्या मोहिमांची आणि कामगिरीची ओळख करून देण्यात आली. १.४८ कोटी विद्यार्थ्यांना डिजिटल प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना ग्रह, उपग्रह आणि विश्वाच्या उत्पत्तीबद्दल माहिती मिळाली. तसेच त्यांना पहिल्यांदाच चांद्रयान ते गगनयान पर्यंतचा संपूर्ण प्रवास तपशीलवार जाणून घेता आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर अंतराळाविषयी सोप्या पद्धतीने माहिती समजून घेऊन भविष्यातील तंत्रज्ञान समजून घेतले. यासोबतच शाळांमध्ये आयोजित केलेली प्रदर्शने, कार्यशाळा आणि इतर उपक्रमांमुळे मुलांना अंतराळ विज्ञानाचे नवीन उड्डाण समजून घेण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने मुलांनी चर्चा, चित्रकला स्पर्धा, प्रदर्शने आणि डिजिटल सेशनमध्ये भाग घेतला. यावेळी त्यांना शिक्षक आणि तज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले.

या कार्यक्रमानंतर विद्यार्थी खूप आनंदी दिसत होते. त्यांनी अवकाश आणि तंत्रज्ञानाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली. पहिल्यांदाच, त्यांना चांद्रयान, आदित्य-एल१ आणि गगनयान सारख्या मोहिमांची संपूर्ण कहाणी कळली. यामुळे त्यांच्यात अंतराळ मोहिमांविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. यावेळी भविष्यात अंतराळात उड्डाण करण्याची प्रेरणा मिळालीच नाही तर विज्ञान आणि अवकाश संशोधनाबद्दल रस आणि उत्साह निर्माण झाला.

"भारताची अंतराळातील कामगिरी नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मुलांना विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यावहारिकदृष्ट्या समजून घेताना पुस्तकांमधून ज्ञान मिळायला हवं असा योगी सरकारचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय अंतराळ दिनाचा उद्देश मुलांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल खोलवर रस निर्माण करणे आणि भविष्यात करिअरच्या उद्देशाने पर्याय तयार करणे आहे. शिक्षण विभागाने स्मार्ट क्लासेस, डिजिटल लायब्ररी, ड्रोन आणि रोबोटिक्स लॅब सारख्या उपक्रमांद्वारे मुलांना आधीच नव्या तंत्रज्ञानाशी जोडले आहे. आता अंतराळ दिनासारखे कार्यक्रम या दृष्टिकोनाला आणखी व्यापक करतील आणि मुलांमध्ये संशोधन आणि नवोपक्रमाचा मार्ग मोकळा करतील," असं शिक्षण मंत्री संदीप सिंह म्हणाले.

Web Title: On the occasion of National Space Day Yogi Government gave information about space to 1.48 crore children of 1.32 lakh council schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.