शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही व्हिसावर भारतीय जातील आता अमेरिका, जर्मनी, इंग्लड आणि फ्रान्सला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:07 IST

आतापर्यंत फक्त या देशांमध्ये स्पेशल रेसिडेन्सी स्टेटस असलेल्या किंवा दीर्घ मुदतीच्या वास्तव्यासाठीच्या व्हिसासाठी निवडलेल्या नागरिकांनाच जाण्याची परवानगी होती.

नवी दिल्ली : नागरी उड्डयन मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियम आणखी शिथील केल्यामुळे भारतीय नागरिकांना अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्सला आता कोणत्याही प्रकारच्या व्हिसावर जाता येईल.आतापर्यंत फक्त या देशांमध्ये स्पेशल रेसिडेन्सी स्टेटस असलेल्या किंवा दीर्घ मुदतीच्या वास्तव्यासाठीच्या व्हिसासाठी निवडलेल्या नागरिकांनाच जाण्याची परवानगी होती.केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रवासाची प्रक्रिया आणखी सोपी केली. त्यानुसार वंदे भारत मिशनच्या पाचव्या टप्प्यात ओव्हरसीज सिटिझनशिप आॅफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांना भारतात प्रवास करता येईल. कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये केंद्राने व्हिसावर बंधने घातली होती. नियम शिथील झाल्यानंतर ओव्हरसीज सिटिझन्स आॅफ इंडिया आणि विशिष्ट वर्गांतील विदेशींना भारतात प्रवास करता येईल. मात्र त्यासाठी भारताचा त्या देशांबरोबर ‘एअर बबल अ‍ॅग्रिमेंट’ झालेला असणे गरजेचे आहे. या करारामुळे दोन देशांत व्यावसायिक उड्डाणांची वाहतूक सहजपणे होते. भारताचा असा करार अमेरिका, इंग्लड, जर्मनी आणि फ्रान्ससोबत झालेला आहे.काय आहे नियम?कराराचा उल्लेख करून गृह मंत्रालयातील अधिकारी म्हणाला की, ‘‘सगळ्या ओसीआय कार्डधारकांना (ज्यांच्याकडे अशा देशांतील पासपोर्टसही आहे) भारतात प्रवेश दिला जाईल. या आदेशाने अशा देशांचा कोणत्याही प्रकारचा वैध व्हिसा असलेल्या भारतीय नागरिकांनाही त्या देशात प्रवेश करण्याची मुभा दिली आहे. मात्र त्या देशामध्ये भारतीय नागरिकांना प्रवेश बंदी नसली पाहिजे.’’