शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत तीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 6:56 AM

८ मार्चला जाहीर सभाही होण्याची शक्यता

हरीश गुप्तानवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा येत्या बुधवारी, ८ मार्च रोजी शपथविधी होणार आहे. त्या तीनही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्रिपुरामध्ये ६० सदस्य असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपने एकट्याने ३२ जागा जिंकल्या आहेत. तर इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) या भाजपच्या घटक पक्षाने एका जागेवर विजय मिळविला. नागालँडमध्ये भाजप आघाडीने ६० पैकी ३७ जागा जिंकल्या. 

मेघालयमध्ये कोन्राड संगमा यांच्या नेतृत्वाखालील एनपीपी पक्षाने ६० पैकी २८ जागा जिंकल्या व भाजपबरोबर सलग दुसऱ्यांदा आघाडी सरकार स्थापन केले. या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुका लढविल्या होत्या. ईशान्य भारतातील या तीन  राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यानुसार या शपथविधी कार्यक्रमांच्या वेळा निश्चित केल्या जातील. पंतप्रधान मोदी त्रिपुरामध्ये जाहीर सभा घेण्याची व ईशान्य भारतातील राज्यांसाठी आणखी विकास प्रकल्पांची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी प्रतिमा भौमिक?

  • मेघालय, त्रिपुरा, नागालँड या तीनही राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 
  • त्रिपुराचे विद्यमान मुख्यमंत्री माणिक साहा यांच्याऐवजी त्या पदावर प्रतिमा भौमिक (वय ५३ वर्षे) यांची भाजप पक्षश्रेष्ठी निवड करणार असल्याची चर्चा आहे. 
  • प्रतिमा भौमिक केंद्रीय सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री आहेत. सध्या भाजपची सत्ता असलेल्या एकाही राज्यात महिला मुख्यमंत्री नाही. भौमिक यांना मुख्यमंत्री करून ती उणीव भरून काढण्याचा विचार आहे.

सरमा यांचे स्वप्न साकारत्रिपुरातील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आगरतळा येथील विवेकानंद मैदानात होणार आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचे (एनइडीए) अध्यक्ष आहेत. त्रिपुरा, नागालँड, मेघालयमध्ये भाजपप्रणित एनडीएला सत्ता मिळवून देणे हे सरमा यांचे स्वप्न साकार झाले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTripuraत्रिपुराChief Ministerमुख्यमंत्री