शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

निष्काळजीपणाचा कळस! ड्यूटी दरम्यान कूलर लावून झोपला नर्सिंग स्टाफ; उपचाराअभावी रुग्णाचा तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 12:15 IST

Nursing Staff Sleeping And Patient Died : आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला असून रुग्णालयातील नर्सिंग स्टाफचा मोठा हलगर्जीपणा पाहायला मिळाला आहे.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला असून रुग्णालयातील नर्सिंग स्टाफचा मोठा हलगर्जीपणा पाहायला मिळाला आहे. ड्यूटी दरम्यान कूलर लावून नर्सिंग स्टाफ झोपल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामुळे एका रुग्णाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला आहे. वॉर्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी ही नर्सिंग स्टाफवर असते. मात्र रुग्णालयातील स्टाफने रुग्णांकडे लक्ष न देता झोप काढली. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बांदामधील जिल्हा रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयातील एका खोलीमध्ये कूलर लावून नर्सिंग स्टाफ झोपला होता. त्यांनी आतून दरवाजा लॉक केला होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी नर्सिंग स्टाफला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. खोलीत झोपलेल्या स्टाफचा त्यांनी एक व्हिडीओ देखील तयार केला. पण याच दरम्यान उपचाराअभावी रुग्णांने आपला जीव सोडला आणि त्याचा मृत्यू झाला. 

संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी दोषी असलेल्या स्टाफवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी राजा दादू नावाच्या 50 वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बर्न वॉर्डमध्ये राजा यांच्यावर उपचार सुरू होते. रात्रीच्या वेळी नर्सिग स्टाफ झोपला होता. याच दरम्यान रुग्णाची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी अनेक छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी फोन केला पण कोणच आलं नाही असा दावा केला आहे. 

रुग्णाच्या पत्नीने आणि भावाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री रुग्णाची प्रकृती बिघडली होती. मात्र यावेळी मेडिकल स्टाफ आरामात कूलर लावून झोपला होता. आम्ही खोलीबाहेरून खूप जोरजोरात आवाज दिला. पण कोणीच उठलं नाही. तसेच सकाळी सात वाजले तरी रुग्णाच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी कोणीच आलं नाही. याच दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आता चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू