शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
3
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
4
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
5
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
6
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
7
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
9
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
10
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
11
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
12
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
13
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
14
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
15
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
16
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
17
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
18
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
19
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
20
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

Nupur Sharma Prophet remark row: दिल्ली ते हैदराबादपर्यंत तीव्र निदर्शने; प्रयागराजमध्ये दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 4:12 PM

Nupur Sharma Prophet remark row: नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात अनेक राज्यात तीव्र निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात येतीये.

Nupur Sharma Prophet remark row: भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्माच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर देशासह विदेशातूनही जोरदार विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या शुक्रवारी नमाजानंतर कानपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर आता आजही नमाजानंतर दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशच्या काही शहरांमध्ये सुरक्षा दलावर मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली.

नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. यावेळी त्यांनी पोस्टर दाखवत जोरदार घोषणाही दिल्या. दिल्लीसहउत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारनपूर, मुरादाबादसह लुधियाना आणि तिकडे पश्चिम बंगालमधील कोलकातामध्येही मुस्लिम समाजाकडून जोरदार विरोध प्रदर्शन झाले. प्रयागराजमध्ये नमाजानंतर पोलिसांवर जोरदार दगडफेक झाली. गेल्या एका तासापासून विविध परिसरात दगडफेक सुरू आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजच्या अटालापरिसरात शुक्रवारच्या नमाजानंतर शेकडो लोक जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू केली. यावळी पोलीस त्यांना समजावण्यास गेली असता, त्यांनी दगडफेक सुरू केली. यात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अजूनही अनेक ठिकाणी वातावरण शांत झाले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

मुरादाबादमध्येही प्रचंड गोंधळ प्रयागराजसोबत तिकडे मुरादाबादमध्येही मोठा हिंसाचार झाला आहे. मुरादाबाद पोलीस स्टेशनच्या मुगलपुरा परिसरात नमाजानंतर मोठा गोंधळ झाला. नुपूर शर्माचे पोस्टर हवेत उडवून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यांना चांगलेच झोडपून काढले.

लुधियानाम आणि लोलकाताध्येही गोंधळ नुपूर शर्माचा पंजाबमध्येही जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. लुधियानामध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदालविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी त्यांचा प्रतिकाक्मक फोटोही जाळण्यात आला. कोलकाता येथील पार्क सर्कस येथेही मोठ्या संख्येने लोक जमले. यासोबतच हावडा परिसरातही लोकांनी नुपूर आणि जिंदालविरोधा तीव्र संताप व्यक्त केला. सध्या घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे.

तिकडे तेलंगाणाची राजधानी हैदराबादमध्येही भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात मक्का मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलक घटनास्थळावरून निघून गेले. पोलीस दल आणि सीआरपीएफ सध्या परिसरात तैनात आहे.

टॅग्स :delhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशwest bengalपश्चिम बंगालTelanganaतेलंगणाMaharashtraमहाराष्ट्र