सिस्टर अभया हत्येप्रकरणी पादरीसह नन दाेषी, बुधवारी शिक्षा सुनावण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 04:56 AM2020-12-23T04:56:27+5:302020-12-23T04:56:51+5:30

Sister Abhaya murder case : पाेलिसांनी आत्महत्येचे प्रकरण नाेंदविले हाेते. मात्र, स्थानिकांनी तीव्र आंदाेलन केल्यानंतर सीबीआयकडे तपास देण्यात आला. 

Nun guilty, along with a priest, will be sentenced on Wednesday in the Sister Abhaya murder case | सिस्टर अभया हत्येप्रकरणी पादरीसह नन दाेषी, बुधवारी शिक्षा सुनावण्यात येणार

सिस्टर अभया हत्येप्रकरणी पादरीसह नन दाेषी, बुधवारी शिक्षा सुनावण्यात येणार

Next

तिरुवनंतपुरम: केरळच्या काेट्टयम येथे २८ वर्षांपूर्वी सिस्टर अभया यांच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने एका पादरी आणि नन यांना दाेषी ठरविले आहे. बुधवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 
एका काॅन्हेंट शाळेत शिकविणाऱ्या २१ वर्षीय सिस्टर अभया यांची २७ मार्च, १९९२ला हत्या करण्यात आली हाेती. गुन्हा लपविण्यासाठी शाळेच्या परिसरातील विहिरीत त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला हाेता. या प्रकरणी फादर थाॅमस काेट्टूर आणि सिस्टर सेफी यांना ताब्यात घेण्यात आले हाेते. पाेलिसांनी आत्महत्येचे प्रकरण नाेंदविले हाेते. मात्र, स्थानिकांनी तीव्र आंदाेलन केल्यानंतर सीबीआयकडे तपास देण्यात आला. 

यासाठी केली हत्या
थाॅमस काेट्टूर हा सिस्टर अभया यांना मानसशास्त्र शिकवित हाेता. सिस्टर सेफी आणाि सिस्टर अभया एका हाेस्टेलमध्ये राहत हाेत्या. हाेस्टेलमध्ये सिस्टर अभयाने घटनेच्या दिवशी पहाटे काेट्टूर, सेफी आणि हाेजे फुथराकयाल यांच्यात अनैतिक संबंध हाेतांना पाहिले हाेते. हा प्रकार उघड हाेऊ नये, यासाठी तिच्या डाेक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आली हाेती. 

Web Title: Nun guilty, along with a priest, will be sentenced on Wednesday in the Sister Abhaya murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.