आता आसाममध्ये भाषेवरून वाद, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, "ब्लॅकमेलिंग नही चलेगी...!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 22:30 IST2025-07-10T22:29:14+5:302025-07-10T22:30:21+5:30
एखाद्या समुदायाने आसमियाला त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तर...!

आता आसाममध्ये भाषेवरून वाद, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, "ब्लॅकमेलिंग नही चलेगी...!"
महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादानंतर, आता आसाममध्येही भाषेवरून वाद निर्माण झाला आहे. आसाममधील जनगणनेदरम्यान एका अल्पसंख्याक विद्यार्थी नेत्याने बंगाली भाषिक मुस्लिमांना आसामीऐवजी बंगाली, हीच आपली मातृभाषा लिहिण्याचे आवाहन केले आहे. यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही इशारा दिला आहे. मुख्यमंत्र हिमंता बिस्वा सरमा यांनी, असमिया भाषा ही आसामची स्थायी राज भाषा असल्याचे म्हणत, कुणीही भाषेचा वापर ब्लॅकमेलिंगचे शस्त्र म्हणून करू नये, असे म्हटले आहे.
एखाद्या समुदायाने आसमियाला त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तर... -
भाषा वादाच्या मुद्द्यावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "आसमिया ही आसामची स्थायी अधिकृत भाषा आहे. तिला घटनात्मक वैधता आहे. भाषेचा वापर ब्लॅकमेलिंग करण्याचे शस्त्र म्हणून करता येणार नाही. त्यांनी आसमिया त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तरी हे तथ्य बदलणार नाही. तथापि, जर एखाद्या समुदायाने आसमियाला त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तर राज्यात किती बेकायदेशीर परदेशी आहेत हे उघड होईल."
ऑल बोडोलँड टेरिटोरियल काउंन्सिल मायनॉरिटीच्या विद्यार्थी संघटनेचा नेता मैनुद्दीन अलीने, येत्या जनगणनेत बंगाली मुस्लिमांनी आसमिया ही मातृभाषा म्हणून लिहू नये, असे आवाहन केले होते. यामुळे हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे. असे केल्यास आसमिया ही आसाममधील बहुसंख्य लोकांची भाषा राहणार नाही, अशे त्याने म्हटले होते.
विद्यार्थी नेत्याची पक्षातून हकालपट्टी -
माध्यमांतील वृत्तांनुसार, विद्यार्थी नेत्याच्या या वादग्रस्त विधानानंतर, ऑल बोडोलँड टेरिटोरियल काउंन्सिल मायनॉरिटीने त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याच बरोबर, संबंधित विद्यार्थी नेत्यानेही त्यांच्या या विधानासंदर्भात माफीही मागितली आहे.