शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

आता पोलिसही सुरक्षित नाहीत, बनावट व्हिजिलेंस अधिकारी करत होते ट्रॅफिट पोलिसांकडून वसुली, अखेरीस...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 08:30 IST

Haryana Crime News: बनावट पोलीस अधिकारी बनून सर्वसामान्यांना गंडा घातल्याच्या तसेच व्हिडीओ कॉलमध्ये अधिकारी असल्याचे भासवून  डिजिटल अरेस्ट करून लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता या बदमाशांनी चक्क पोलिस अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बनावट पोलीस अधिकारी बनून सर्वसामान्यांना गंडा घातल्याच्या तसेच व्हिडीओ कॉलमध्ये अधिकारी असल्याचे भासवून  डिजिटल अरेस्ट करून लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता या बदमाशांनी चक्क पोलिस अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट व्हिजिलेन्स अधिकारी बनून ट्रॅफिक पोलिसांकडून पैशांची वसुली करत होते.या प्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपींची ओळख दीपक आणि नितीन कुमार अशी पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनीही अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले होते. दरम्यान, तक्रार मिळताच तत्काळ कारवाई करून त्यांना सेक्टर-४० मधून अटक केली.

मेफिल्ड गार्डन ट्रॅफिक सिग्नलवर तैनात असलेल्या ट्रॅफिक झोनल अधिकाऱ्याने तक्रार केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. ‘१५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दोन आरोपी कारमधून आले. त्यांनी आपण व्हिजिलेन्स अधिकारी असल्याचे सांगितले आणि आम्हाला सोबत घेऊन गेले. जवळच्या पोलिस चौकीत  गेल्यानंतर तुमच्याविरोधात तक्रारी आल्या आहेत, अशी बतावणी त्यांनी केली’, असे या अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या झोनल ट्रॅफिक अधिकाऱ्याने तक्रारींचं विवरण मागितलं तेव्हा आरोपींनी नंतर व्हॉट्सअॅप कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर रात्री आरोपींनी या अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअॅपवर धमकी देणारा व्हिडीओ पाठवला आणि पैशांची मागणी केली. मात्र सदर झोनल अधिकाऱ्याने त्यांची मागणी फेटाळून लावली, तसेच त्वरित पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आणि तांत्रिक सर्व्हिलान्स आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर मंगळवारी दोघांनाही अटक केली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Vigilance Officers Extort Traffic Police; Arrested After Complaint.

Web Summary : Two men posing as vigilance officers extorted money from traffic police. They threatened an officer with a video after he asked for details, leading to their arrest following a complaint.
टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीHaryanaहरयाणा