शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

आता जम्मू-काश्मीरचा चेहरामोहरा बदलणार, प्रकल्पांची लाट! PM मोदींनी ५३ विकास प्रकल्पांची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 1:43 PM

यावेळी त्यांनी ६ हजार ४०० कोटी रुपयांच्या तब्बल ५३ विकास प्रकल्पांची घोषणा केली. अनेक प्रकल्पांमुळे जम्मू-काश्मीरचा चेहरामोहरा आता बदलणार आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी ६ हजार ४०० कोटी रुपयांच्या तब्बल ५३ विकास प्रकल्पांची घोषणा केली. अनेक प्रकल्पांमुळे जम्मू-काश्मीरचा चेहरामोहरा आता बदलणार आहे.

नेमक्या कोणत्या प्रकल्पांचे उद्घाटन- ५ हजार कोटी रुपयांचा सर्वसमावेशक कृषी विकास कार्यक्रम- स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजना- हजरतबल तीर्थक्षेत्राचा विकास- चॅलेंज बेस्ड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत पर्यटन स्थळांची घोषणा - देखो अपना देश पीपल्स चॉइस २०२४चे अनावरण - इंडिया ग्लोबल डायस्पोरा मोहीम- मधुमक्षिका पालनासाठी अनुदान- अनिवासी भारतीय भारतात येण्यासाठी प्रोत्साहित व्हावेत यासाठी ‘चलो इंडिया’ मोहीम

पर्यटकांचा विक्रमआज जम्मू आणि काश्मीर पर्यटनातील सर्व विक्रम मोडत आहे. एकट्या २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये २ कोटींहून अधिक पर्यटक आले आहेत. गेल्या १० वर्षांत अमरनाथ यात्रेला सर्वाधिक भाविकांनी हजेरी लावली.माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.

तुमच्या पसंतीची पर्यटन स्थळे विकसित करणारदेखो अपना देश पीपल्स चॉइस’ मोहिमेंतर्गत पुढील २ वर्षांत पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्यासाठी सरकारने ४० ठिकाणे निश्चित केली आहेत. या मोहिमेंतर्गत सरकार जनमताच्या आधारे सर्वाधिक पसंतीची पर्यटन स्थळे विकसित करेल. अनिवासी भारतीयांना (एनआरआय) भारतात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘चलो इंडिया’ मोहीमही चालविण्यात येणार आहे. यामुळे या प्रदेशातील पर्यटन उद्योग विकसित होण्यास मदत होणार आहे.

हायवे आणि रोपवेसाठी २,०९३ कोटीकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमधील दोन महामार्ग आणि रोपवे प्रकल्पाच्या रुंदीकरणासाठी २,०९३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे उत्तर काश्मीरमधील पर्यटन क्षेत्राच्या विकासाला हातभार लागणार आहे.

जम्मू काश्मीर बँकेला असा झाला फायदा१७०० कोटी - बँकेचा नफा वाढला आहे.१,००० - कोटी रुपयांची बँकेला  आर्थिक मदत१.२५ लाख कोटींवरून व्यवसाय २.२५ लाख कोटींवर८० हजार कोटींवरून ठेवी  १.२५ लाख कोटींवर

शेती अशी बहरणार- केशर, सफरचंद, सुका मेवा आणि चेरीच्या उत्पादनात वाढ होत आहे.- ५ हजार कोटी रुपयांच्या कृषी विकास कार्यक्रमामुळे जम्मू आणि काश्मीरच्या कृषी क्षेत्रात पुढील ५ वर्षांत अभूतपूर्व वाढ होईल.- विशेषत: फलोत्पादन आणि पशुधन विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.- फळे आणि भाज्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक- जगातील सर्वांत मोठी गोदाम योजना सुरू करण्यात आल्याचा फायदा होणार आहे.

स्मार्ट सिटी बनविण्याचे काम- एम्स काश्मीरचे काम सुरू आहे.- ७ नवीन वैद्यकीय महाविद्यालये, २ कर्करोग रुग्णालये- आयआयटी, आयआयएम उभारणार- २ वंदे भारत ट्रेन सुरू - जम्मू आणि श्रीनगरला स्मार्ट सिटी बनविण्याचे काम सुरू

तरुणांसाठी काय? - कौशल्य विकासासाठी अनेक योजना सुरू- जम्मूच्या प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक क्रीडा सुविधा- १७ जिल्ह्यांमध्ये  इनडोअर स्पोर्टस हॉल 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर