“आता तुरुंग हेच माझे जीवन आहे”; उमर खालिद याची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:32 IST2026-01-06T10:32:43+5:302026-01-06T10:32:43+5:30
उमर, शरजिल यांना जामीन नाही, मात्र, बलात्कारातील दोषी राम रहीमला मात्र १५ व्या वेळेस पॅरोल दिली जात असल्याची टीका माकपचे खासदार जॉन ब्रिटास यांनी केली.

“आता तुरुंग हेच माझे जीवन आहे”; उमर खालिद याची खंत
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उमर खालीद व शरजिल इमाम यांचा जामीन फेटाळला. न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर उमर खालीदची मैत्रीण बनो ज्योत्स्ना लाहिरीने त्याच्याशी झालेला संवाद सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यानुसार, खालीदने इतर आरोपींना जामीन मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून आपला जामीन नाकारला जाणे नियतीनुसार स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. ‘आता तुरुंग हेच माझे जीवन आहे’, असे सांगितल्याचे यात नमूद आहे.
उमर, शरजिल यांना जामीन नाही, मात्र, बलात्कारातील दोषी राम रहीमला मात्र १५ व्या वेळेस पॅरोल दिली जात असल्याची टीका माकपचे खासदार जॉन ब्रिटास यांनी केली.
...भरपाई होऊ शकत नाही
माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार म्हणाले, आज या देशातील स्वातंत्र्यप्रेमी लोक खूप नाराज असतील. कारण खालीद आणि इमाम हे खूप दिवसांपासून तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार, दीर्घकाळ तुरुंगवास ही जामीन मंजूर करण्यासाठी एक सबळ बाब मानली पाहिजे. शेवटी एकदा गमावलेल्या अशा स्वातंत्र्याची भरपाई होऊ शकत नाही.