Now playing DJ will result in 5 years imprisonment | आता डीजे वाजविल्यास होणार 5 वर्ष तुरुंवासाची शिक्षा
आता डीजे वाजविल्यास होणार 5 वर्ष तुरुंवासाची शिक्षा

इलाहाबाद: उत्तरप्रदेशमधील इलाहाबाद उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयात डीजे वाजविण्यावर संपूर्ण बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर 5 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा आणि एक लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. डीजे वाजवल्याची तक्रार असल्यास त्या भागातील स्टेशन प्रभारी जबाबदार असल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

डीजेवर बंदी घालावी यासाठी हासिमपुरमधील रहिवाशी सुशील चंद्र श्रीवास्तव सोबतच अन्य लोकांनी देखील न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुशील चंद्र श्रीवास्तव यांच्या याचिकेत हासिमपुरामध्ये सायंकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यत डीजे वाजविला जाते. तसेच माझ्या घरी 84 वर्षीय आई असल्याने तिला मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे सांगितले होते.  या याचिकेवर न्यायमूर्ती पीकेएस बघेल आणि पंकज भाटिया यांनी याबाबत निर्णय दिला आहे.

न्यायालयाने सांगितले की, लहान मुलांसोबतच जेष्ठ नागरिक आणि रुग्णालयातील लोकांना ध्वनी प्रदुषण अतिशय धोकादायक आहे. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याचे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे. त्याचप्रमाणे सर्व धार्मिक सणाच्या पहिले डीएम व एसएसपी यांनी बैठक बोलावून कायदा बनविण्याचे आदेश दिले आहे. तसेच या कायद्याचे उल्लंघन केल्यास 5 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. 

Web Title: Now playing DJ will result in 5 years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.