शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

Note Ban : RBIचा नोटाबंदीवरील अहवाल धक्कादायक, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 3:14 PM

आरबीआयनं नोटाबंदीवरील प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा दाखला देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी लागू केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बादल झालेल्या 99.30 टक्के नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्याचा अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने आपला 2017-18 चा  वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. जवळपास दोन वर्षांनंतर आरबीआयनं अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालावरून सर्व स्तरातून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेनंही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीचा निर्णय हा मोठा गुन्हा होता. रिझर्व्ह बँकेचा अहवाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच याप्रकरणी संसदेत चर्चा झाली पाहिजे, अशीही मागणी राऊत यांनी केली आहे. 

नेमके काय म्हणाले संजय राऊत?मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला शिवसेनेने सुरूवातीपासून विरोध केला आहे. ज्या-ज्या वेळेस संधी मिळते, त्या-त्या वेळेस शिवसेना मोदी सरकारवर या निर्णयावरुन निशाणा साधताना दिसली आहे. नोटाबंदीवरील रिझर्व्ह बँकेचा आलेला अहवाल धक्कादायक आहे. अनेकांचा रांगेत उभा राहून मृत्यू झाला. हा मोठा गुन्हा आहे. या अहवालावर संसदेत चर्चा झाली पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी  500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यानंतर देशभरात अभूतपूर्व चलनटंचाई होऊन जुन्या नोटा बदलवून घेण्यासाठी बँकांसमोर रांगा लागल्या होत्या. नोटाबंदीमुळे मोठ्या प्रणाणात काळा पैसा बँकेत परत येणार नाही, असा दावा करण्यात येत होता. मात्र तब्बल 99 टक्क्यांहून अधिक नोटा परत बँकेत आल्याने नोटाबंदीच्या निर्णयाचा नेमका फायदा काय झाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात आरबीआयने देशाची आर्थिक स्थिती सुधारल्याचा तसेच देशातील गुंतवणूक आणि उत्पादन वाढल्याचा दावा केला आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी महागाईसुद्धा काही प्रमाणात कमी झाल्याचे आरबीआयने या अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतNote Banनोटाबंदीreservationआरक्षण