एक-दोन नव्हे भारतात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट; रुग्णांच्या संख्येतही होतेय वाढ! महाराष्ट्रात किती लोकांना लागण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:59 IST2025-05-30T13:54:00+5:302025-05-30T13:59:29+5:30

कोव्हिड -१९ विषाणूने पुन्हा एकदा भारतात शिरकाव केला असून, देशातील अनेक राज्यांमध्ये संसर्गाच्या संख्येत आणि मृत्यूंमध्ये वाढ होताना दिसत ...

Not one or two, but four new variants of Corona in India; The number of patients is also increasing! How many people are infected in Maharashtra? | एक-दोन नव्हे भारतात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट; रुग्णांच्या संख्येतही होतेय वाढ! महाराष्ट्रात किती लोकांना लागण?

एक-दोन नव्हे भारतात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट; रुग्णांच्या संख्येतही होतेय वाढ! महाराष्ट्रात किती लोकांना लागण?

कोव्हिड -१९ विषाणूने पुन्हा एकदा भारतात शिरकाव केला असून, देशातील अनेक राज्यांमध्ये संसर्गाच्या संख्येत आणि मृत्यूंमध्ये वाढ होताना दिसत आहे. चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या देशांतील रुग्णसंख्येत झालेल्या वाढीनंतर भारतातही या विषाणूचे नवे उपप्रकार झपाट्याने पसरत आहेत. JN.1, NB.1.8.1, LF.7 आणि XFG हे ओमिक्रॉनचे उपप्रकार असून, त्यांचा संसर्ग वेगाने होत आहे. मात्र, बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा उच्चांक
महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्ण नोंदवले जात असून, गुरुवारी राज्यात ७६ नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली. राज्यात जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ५९७ रुग्ण आढळले असून, सध्या ४२५ सक्रिय रुग्ण आहेत. यातील १६५ रुग्ण बरे झाले असून, सात मृत्यू झाले आहेत. मृत्यू पावलेल्यांपैकी सहा जणांना इतर गंभीर आजार होते.

मुंबईत २७, पुण्यात २१, ठाणे महानगरपालिकेत १२, कल्याणमध्ये ८, नवी मुंबईत ४, कोल्हापूर आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी १ तर रायगड जिल्ह्यात २ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, मुंबईतच एकूण ३७९ रुग्ण नोंदले गेले आहेत.

राजस्थानातही संसर्गाची झपाट्याने वाढ
राजस्थानमध्ये गुरुवारी १५ नवे रुग्ण सापडले. त्यापैकी ९ रुग्ण जयपूरमध्ये आढळले. उर्वरित प्रकरणे जोधपूर (२) आणि उदयपूर (४) येथे नोंदवली गेली. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) तपासलेल्या नमुन्यांमधून XFG आणि LF.7.9 प्रकारांची उपस्थिती निष्पन्न झाली आहे. हे प्रकार सध्या प्रामुख्याने पश्चिम व दक्षिण भारतात आढळून येत आहेत.

कर्नाटक आणि चंदीगडमध्ये मृत्यूंची नोंद
कर्नाटकातील एका ७० वर्षीय व्यक्तीचा एन्सेफॅलोपॅथी आणि इतर आजारांमुळे मृत्यू झाला, तर चंदीगडमधील सरकारी रुग्णालयात एका ४० वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशभरातील स्थिती
सध्या भारतात १,२५२ सक्रिय कोविड रुग्ण आहेत आणि एकूण १३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

लक्षणे आणि खबरदारी
आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले की रुग्णांमध्ये घसा खवखवणे, ताप, अतिसार, सौम्य पोटदुखी, थकवा आणि आवाजातील बदल अशी लक्षणे दिसून येत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR यांनी राज्यांना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि उच्च जोखमीच्या गटासाठी बूस्टर डोस देणे यावर भर दिला आहे.

Web Title: Not one or two, but four new variants of Corona in India; The number of patients is also increasing! How many people are infected in Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.