"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:36 IST2025-06-24T15:35:26+5:302025-06-24T15:36:29+5:30

Crime News:

"'Not one, not two, but my wife married five times, now she is having love affairs with her brother-in-law'," distressed husband runs to the police | "एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 

"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 

गेल्या काही दिवसांपासून विवाहबाह्य संबंधांच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पतीने त्याच्या पत्नीवर पाच लग्नं केल्याचा आरोप केला आहे. त्रस्त पतीने सांगितले की, त्याच्या पत्नीने आता तिच्या दिरासोबत संसार थाटला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत पुढील तपास सुरू केला आहे.

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील राधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकरणाबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित पती पंकज अग्रहरी हा पेशाने भाजी विक्रेता आहे. त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. पीडित पतीने सांगितले की, माझी पत्नी गुडिया हिने  मला आणि माझ्या आई वडिलांना घरातून बाहेर काढलं आहे. तसेच बाहेरील तरुणांना बोलावून तिने आम्हाला मारहाणही केली आहे. गुडिया हिने संपूर्ण घरावर कब्जा केला असून, ती आता तिच्या दिरासोबत राहत आहे.

त्याने पुढे सांगितले की, आमचं लग्न १६ एप्रिल २०२४ रोजी झालं होतं. लग्नानंतर काही महिन्यांतच गुडिया हिचं वागणं बदललं. तिने पंकजचं सगळं सामान, दागदागिने आणि रोख रक्कम माहेरी पाठवली. आता ती मला आणि माझ्या आई वडिलांना घरात पाऊलही ठेवायला देत नाही आहे.

दरम्यान,  माझी पत्नी गुडिया हिची आधीच चार लग्नं झाली होती. तसेच त्यातील तीन लग्नं फतेहपूर येथे झाली होती. मी स्वत: गुडियाचा पाचवा पती आहे, असा आरोपही पंकज याने केला. माझ्या पत्नीने लग्नाचा बाजार मांडला असून, ती लग्नानंतर सगळं सामान बांधून नव्या जोडीदाराबरोबर निघून जाते, असा आऱोपही त्याने केला. दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.  

Web Title: "'Not one, not two, but my wife married five times, now she is having love affairs with her brother-in-law'," distressed husband runs to the police