शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

देशव्यापी नाही; पण 20 राज्यांत लॉकडाऊन, अनेक राज्यांमध्ये निवडणुकीनंतर बिघडली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 2:59 AM

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी १० मेपासून दोन आठवड्यांच्या कठोर लॉकडाऊनची घोषणा केली.

हरीश गुप्ता -नवी दिल्ली : देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. अनेक राज्यांमध्ये नव्या रुग्णांचा आलेख वाढताच आहे. या परिस्थितीचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून, अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. देशव्यापी नाही; पण २० राज्यांत लॉकडाऊन, संचारबंदी लागू केली आहे. त्यात आता तामिळनाडूचाही समावेश झाला आहे. (Not nationwide; But the lockdown in 20 states, the situation worsened after the election in many states)तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी १० मेपासून दोन आठवड्यांच्या कठोर लॉकडाऊनची घोषणा केली. इतक्या राज्यांत लॉकडाऊन लागला असला तरी केंद्र सरकार संपूर्ण देशात तो लावणार नाही.  तामिळनाडूसह काही राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर परिस्थिती बिघडल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत २६ राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केलेला नसला, तरीही देशातील बहुतांश भागात लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशात सध्या केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगढ, मिझोराम, नागालँड, पुद्दुचेरी, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे, तर महाराष्ट्र, गुजरात, आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊनप्रमाणेच रात्रीची संचारबंदी, तसेच कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.  लॉकडाऊन लावण्यात आलेल्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्ययानंतर परिस्थिती बिघडल्याचे दिसून आले आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या, तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गोव्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकांनंतर या राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली. 

उ. भारतात लॉकडाऊन-    उत्तर भारतात जम्मू आणि काश्मीर, तसेच उत्तराखंड वगळता सर्वच राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर तेथील परिस्थिती बिघडली, तर उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागली. दक्षिणेतील चार राज्यांमध्ये लॉकडाऊन-    देशात सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद महाराष्ट्रात होत आहे. त्यानंतर कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांचा क्रमांक आहे. केरळमध्येही शनिवारी ४१ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले.-    कर्नाटकमध्येही आकडा ५० हजारांवर पोहोचला. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वगळता दक्षिणेकडील तीनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात लॉकडाऊन आहे.

देशात प्रथमच एका दिवसात ४ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू-    देशामध्ये शनिवारी कोरोनाचे ४ लाख १ हजार नवे रुग्ण आढळून आले तसेच ३ लाख १८ हजारपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले. या दिवशी आढळलेल्या नव्या रुग्णांची संख्या शुक्रवारपेक्षा १४ हजारांनी कमी होती. मात्र शनिवारी कोरोना संसर्गामुळे ४,१८७ जण मरण पावले. देशात एका दिवसात प्रथमच मृतांचा आकडा ४ हजारांच्या पुढे गेला आहे.

-     कोरोनामुळे बळी गेलेल्यांची एकूण संख्या २,३८,२७० झाली आहे. देशात ३७,२३,४४६ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोना लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६ कोटी ७३ लाख ३० हजार ९६० जणांना लस देण्यात आली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.९० टक्के आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रgoaगोवाUttar Pradeshउत्तर प्रदेशKeralaकेरळKarnatakकर्नाटकMadhya Pradeshमध्य प्रदेश