CAA वरुन एक इंचही मागे हटणार नाही, अमित शहांनी ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 13:00 IST2020-01-04T12:59:57+5:302020-01-04T13:00:16+5:30
नागरिकता दूरस्ती कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेसने या कायद्याल विरोध केला

CAA वरुन एक इंचही मागे हटणार नाही, अमित शहांनी ठणकावले
जोधपूर - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा नागरिकत्व दूरस्ती कायद्यासंदर्भात सरकार अजिबात मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलंय. राजस्थानच्या जोधपूरमध्ये सीएएच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला संबोधित करताना, काँग्रेसला इशारा दिला. सीएए हा नागरिकता काढून घेण्यासाठी नसून नागरिकात देण्यासाठीचा कायदा असल्याचं आम्ही अल्पसंख्याक समाजातील तरुणांना समजावून सांगू, असे शहा यांनी म्हटलंय.
नागरिकता दूरस्ती कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेसने या कायद्याल विरोध केला असून देशात जोरदार आंदोलने होत आहेत. या आंदोलनामध्ये काँग्रेस मोठ्या हिरिरीने सहभागी होत आहे. या कायद्यावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सीएए म्हणजे मुस्लीमविरोधी कायदा असल्याचा अपप्रचारही करण्यात येत आहे. तर, भाजपा नेत्यांकडून हा कायदा मुस्लीमविरोधी नसून देशहिताचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
अमित शहांनी या कायद्याला होणाऱ्या विरोधावरुन पुन्हा एकदा काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांना ठणकावले आहे. देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले तरी, नागरिकता दूरुस्ती कायद्याबाबत भाजपा एक इंचही मागे हटणार नाही, असे शहा यांनी स्पष्ट केलंय. तसेच, राहुल गांधींना सीएए कायद्यावरील चर्चेसाठी खुलं आव्हानही दिलंय. जर राहुल बाबाने हा कायदा वाचला नसेल तर, मी इटालियन भाषेत या कायद्याचं भाषांतर करुन पाठवतो, असेही अमित शहांनी म्हटले.