शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

1 तीर 2 शिकार? नॉर्थ-ईस्टला मिळू शकते पहिली महिला CM! त्रिपुरात भाजप चालणार मोठी चाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:53 IST

राष्ट्रीय नेतृत्व सध्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांना राज्यातील सर्वोच्च पदावर नियुक्त करण्याचा विचार करत आहे. जाणून घ्या काय आहे भाजपची खेळी...

अगरतळा - भाजप आणि आयपीएफटी युतीने एकूण 60 सदस्य संख्या असलेल्या त्रिपुरा विधानसभेत 33 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. या युतीने 2018 मध्ये राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (सीपीआय-एम) 25 वर्षांची सत्ता उखडून टाकली होती. हा केवळ योगायोग नव्हता हेदेखील या विजयावरून सिद्ध झाले आहे. या निवडणुकीपूर्वी विद्यमान मुख्यमंत्री माणिक साहा हेच आपले CM पदाचे उमेदवार असतील, असे या पक्षांनी जाहीरपणे मान्य केले होते. मात्र आता निवडणुका संपल्यानंतर हे पक्ष आपल्या या निर्णयाची पुन्हाएकदा समीक्षा करू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तानुसार, पक्षाच्या सूत्रांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय नेतृत्व सध्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांना राज्यातील सर्वोच्च पदावर नियुक्त करण्याचा विचार करत आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीपूर्वी 'ईशांन्येकडील राज्यांसह संपूर्ण देशात योग्य संदेश जाऊ शकतो.

याच बरोबर, पक्षातील आणिखी एका सूत्राने म्हटल्याप्रमाणे, साहा यांनी पक्षाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे असे होणे अशक्य आहे. मात्र काही दिवसांनंतर, हा बदल होऊ शकतो. भौमिक मुख्यमंत्री झाल्यास, त्या ईशान्येकडील इतिहासातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील.

केंद्रात लागू शकते माणिक साहा यांची वर्णी -भौमिक यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या शक्यतेसंदर्भात विचारले असता एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे की, हे नाकारता येत नाही. जर केंद्राने भौमिक यांना त्रिपुराचे मुख्यमंत्री बनविण्याचा विचार केला, तर माणिक साहा यांना केंद्रात पाठवले जाऊ शकते.” महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानंतर, समर्थनाच्या आधारावर महिलांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्या उत्सुक असतानाच, भाजप भौमिक यांना त्रिपुराचे मुख्यमंत्री बनवण्याचा विचार करत आहे.  त्रिपुरामध्ये महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा अधिक -भौमिक या भारत आणि बांगलादेश सीमेला लागून असलेल्या धनपूर गावातील एका शेतकरी कुटुंबातून आल्या आहेत. आदिवासीबहुल भागांत झटका बसला असतानाही, राज्यात भाजपला पुन्हा एकदा सत्तेपर्यंत पोहचविण्यात महिला मतदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या वर्षी महिलांनी (89.17%) पुरुषांच्या (86.12%) तुलनेत अधिक मतदान केले. धनपूर येथून भौमिक यांचा 3,500 मतांनी विजय झाला आहे. माकपचे ज्येष्ठ नेते माणिक सरकार याच मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले होते. 2018 मध्येही ते येथूनच निवडून आले होते आणि विरोधी पक्षनेते झाले होते.

टॅग्स :Tripuraत्रिपुराBJPभाजपाElectionनिवडणूकChief Ministerमुख्यमंत्रीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डा