नेमाडेही संमेलनाध्यक्ष होऊ शकतात द.भि कुलकर्णींचे वक्तव्य

By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:21+5:302015-07-31T22:25:21+5:30

पुणे : ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे येत्या काळात संमेलनाध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी कठोर भाषेत आपले मत मांडले असले तरीही आपण त्यांच्या शैलीत बोलावे असे अजिबात नाही. असे मत प्रसिद्ध समिक्षक डॉ. द.भि कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नमस्ते नेमाडे-नेमाडे कुठून कुठपर्यंत...? या चर्चासत्रात ते बोलत होते. प्रा. मिलींद जोशी यांनी डॉ. कुलकर्णी यांच्याशी डॉ. नेमाडे यांच्या साहित्यविषयक वाटचालीवर यावेळी चर्चा करण्यात आली. नेमाडेंचे कौतुक करत असतानाच त्यांच्यावर थेट टीका केल्याने नेमाडेंच्या ओळखीबाबत उपस्थित संभ्रमित झाले.

Nomadee can also be the president of the meeting | नेमाडेही संमेलनाध्यक्ष होऊ शकतात द.भि कुलकर्णींचे वक्तव्य

नेमाडेही संमेलनाध्यक्ष होऊ शकतात द.भि कुलकर्णींचे वक्तव्य

णे : ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे येत्या काळात संमेलनाध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी कठोर भाषेत आपले मत मांडले असले तरीही आपण त्यांच्या शैलीत बोलावे असे अजिबात नाही. असे मत प्रसिद्ध समिक्षक डॉ. द.भि कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नमस्ते नेमाडे-नेमाडे कुठून कुठपर्यंत...? या चर्चासत्रात ते बोलत होते. प्रा. मिलींद जोशी यांनी डॉ. कुलकर्णी यांच्याशी डॉ. नेमाडे यांच्या साहित्यविषयक वाटचालीवर यावेळी चर्चा करण्यात आली. नेमाडेंचे कौतुक करत असतानाच त्यांच्यावर थेट टीका केल्याने नेमाडेंच्या ओळखीबाबत उपस्थित संभ्रमित झाले.
डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले, कोणी भडक काही बोलत असेल तर आपणही तसेच न बोलता त्या गोष्टीचा फेरविचार करावा. वाचकाला जबरदस्त धक्का देणं हे प्रक्षुब्ध लेखकाचे काम असते. नेमाडेंनी आपल्या लेखनातून धक्कातंत्राने टीका केलेली आहे. नेमाडेंच्या कोसला ही कादंबरी गाजली असली तरीही त्यामुळे त्यांचा गौरव आणि टीका दोन्हीही झाल्याने लेखक म्हणून त्यांचे अजूनही वांडमयीन मूल्यमापन झालेले नाही. कोसलाचा काळ ५० वर्षांनी पुढे गेलेला असला तरीही कादंबरीतील तरुणाची मानसिकता आजही तीच आहे. माणूस, प्रतिभावंत आणि विचारवंत या तीने वेगळ्या भूमिका असून या तिन्ही भूमिकांमधील नेमाडे वेगळे आहेत.
कोसला ही कादंबरी नसून ती दिर्घकथा आहे. कादंबरी हा देशी प्रकार नाही तर तो पाश्चात्यांकडून आयात केलेला साहित्यप्रकार आहे. कथा हा मूळ देशी प्रकार आहे असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. नेमाडेंनी येत्या काळात नागपूर-विदर्भाचे वर्णन करावे अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.



साहित्यसंमेलन असलेच पाहीजे.
संमेलन हे उत्सवीच असले पाहीजे. उत्सवाला आपल्याकडे मूलभूत सांस्कृतिक महत्त्व आहे त्यामुळे साहित्याच्या बाबतीतही हे महत्त्व जपले गेले पाहीजे. समाजाला साहित्याभिमुख करणे यासाठीच संमेलने असतात. यावर टीका करताना डोकं दुखतं म्हणून डोकं छाटून टाकणे योग्य नाही अशी खरमरीत टीका करत नेमाडेंची व्यक्त होण्याची पद्धत मला मान्य नाही असेही डॉ. द.भि म्हणाले.

नेमाडेंवर टीका
नेमाडे यांच्यातील लेखकाचा लेखकराव झाला आहे का यावर, तसे झाले नाही पण त्यांच्या निष्ठेशी ते तडजोड करत आहेत. तसेच नेमाडे ज्ञानपीठच्या पुढील नोबेल सारख्या कोणत्या पुरस्काराची वाट पहात असतील तर या गोष्टीकडे गांभीर्याने पहायला हवे.

Web Title: Nomadee can also be the president of the meeting