शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 8:47 AM

काँग्रेस, भाजपाचे सर्जिकल स्ट्राइकवरुन दावे-प्रतिदावे

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकवरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करुन दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केला जात आहे. यानंतर काँग्रेसनंदेखील यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. भाजपा, काँग्रेस सर्जिकल स्ट्राइकवरुन एकमेकांवर 'स्ट्राइक' करत असताना प्रथमच लष्करानं यावर भाष्य केलं आहे. लष्करानं सर्जिकल स्ट्राइकबद्दलच्या आरटीआयला उत्तर दिलं आहे.  यूपीए सरकारच्या काळात पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती उपलब्ध नसल्याचं लष्करानं आरटीआयला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. लष्कराच्या डीजीएमओ (डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स) यांनी ही माहिती दिली आहे. यासाठी जम्मू-काश्मीरमधले आरटीआय कार्यकर्ते रोहित चौधरींनी अर्ज केला होता. 2004 ते 2014 या कालावधीत भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये घुसून किती सर्जिकल स्ट्राइक केले आणि त्यातले किती यशस्वी झाले, असे प्रश्न चौधरींनी त्यांच्या अर्जात विचारले होते. 29 सप्टेंबर 2016 च्या आधी सर्जिकल स्ट्राइक झाल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असं उत्तर डीजीएमओंनी या आरटीआयला दिलं.पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये अनेकदा सर्जिकल आणि एअर स्ट्राइकचा उल्लेख केला आहे. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं, असंदेखील मोदींनी अनेकदा म्हटलं आहे. तर गेल्याच आठवड्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले. मात्र कधीही त्याचा वापर मतं मिळवण्यासाठी केला नाही, असं सिंग एका मुलाखतीत म्हणाले.मनमोहन सिंग यांच्या दाव्यानंतर काँग्रेसनं एक पत्रकार परिषद घेतली. त्यात पक्षाचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. शुक्ला यांनी पत्रकारांना संबोधित करताना सर्जिकल स्ट्राइक नेमके कुठे आणि कधी करण्यात आली, याची तपशीलवार माहिती दिली. पूंछमधील भट्टल सेक्टर (19 जून 2018), केलमधील शारदा सेक्टर (30 ऑगस्ट-1 सप्टेंबर 2011), सावन पात्रा चेकपोस्ट (6 जानेवारी 2013), नाझपीर सेक्टर (27-28 जुलै 2013), नीलम व्हॅली (6 ऑगस्ट 2013) आणि 23 डिसेंबर 2013 रोजी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आल्याचं शुक्ला म्हणाले. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर केला नाही, अशा शब्दांत शुक्ला यांनी मोदींना टोला लगावला.   

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPakistanपाकिस्तान