शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

"आता ते कुणीही हटवू शकत नाही..."; सेंगोल हटवण्याच्या मागणीवरून गदारोळ, भाजपचं SP-काँग्रेसला प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 13:26 IST

सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक असल्याचे म्हणत, ते काढून टाकावे आणि त्या जागेवर संविधान स्थापन करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाने (एसपी) केली आहे. 

लोकसभा निवडणूक 2024 नंतर संसदेचे पहिले अधिवेशन सुरू आहे. नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचा शपथविधीनंतर आणि सभापती निवडीनंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. यानंतर, संसदेत स्थापन करण्यात आलेल्या सेंगोलवरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी संसद भवनातील सभापतींच्या आसनाजवळ लावण्यात आलेला सेंगोल हटवण्याची मागणी केली आहे. सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक असल्याचे म्हणत, ते काढून टाकावे आणि त्या जागेवर संविधान स्थापन करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाने (एसपी) केली आहे. 

"संविधान महत्वाचे" -यासंदर्भात, समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आरके चौधरी म्हणाले, "संविधान महत्त्वाचे आहे, ते लोकशाहीचे प्रतीक आहे. आपल्या गेल्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने संसदेत 'सेंगोल' स्थापन केले आहे. 'सेंगोल' म्हणजे 'राजदंड', याचा अर्थ 'राजाचा दंड' असाही होतो. राजेशाही संपवून देश स्वतंत्र झाला. देश 'राजाच्या दंडा'ने चालणार की संविधानाने? संविधान वाचवण्यासाठी संसदेतून सेंगोल हटविले जावे," अशी माझी मागणी आहे.

काय म्हणाले अखिलेश यादव? -आरके चौधरी यांच्या विधानावर बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख तथा खासदार अखिलेश यादव म्हणाले, "जेव्हा सेंगोल स्थापन करण्यात आला तेव्हा पंतप्रधान त्याच्यासमोर नतमस्तक झाले होते. कदाचित शपथ घेतांना ते हे विसरले. यामुळे, माझ्या पक्षाने त्यांना याची आठवण करून देण्यासाठी असे म्हटले असू शकते, असे मला वाटते. जर पंतप्रधानच त्याच्यासमोर नतमस्तक व्हायरला विसरले असतील, तर कदाचित त्यांचीही आणखी काही इच्छा असेल." अखिलेश यांच्या विधानावर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनीही, संविधान महत्वाचे आहे. आम्ही इंडिया ब्लॉकमध्ये यावर चर्चा करू, असे म्हटले आहे. 

समाजवादी पक्षाला काँग्रेस-आरजेडीचंही समर्थन -यामुद्यावर काँग्रेस आणि आरजेडीनेही समाजवादी पक्षाचे समर्थन केले आहे. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी, भाजपने आपल्या मनाने सेंगोल लावला आहे. सपाची मागणी योग्य आहे. सभागृह सर्वांना सोबत घेऊन चालते. भाजप केवळ मनमानी करते, असे म्हटले आहे. तर आरजेडी नेत्या मीसा भारती यांनी, सेंगोल हटवायला हवे, हे लोकशाहीत आहे, राजेशाहीत नाही. सेंगोल म्यूझियममद्ये लावायला हवा. हे राजेशाहीचे प्रतिक आहे. यामुळे सेंगोल हटायला हवा.

भाजपचं प्रत्युत्तर -आरके चौधरी यांच्या वक्तव्यावर भाजपचे लोकसभा खासदार खगेन मुर्मू म्हणाले, या लोकांना दुसरे काही काम नाही. यांनी संविधानाच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज पसरवला. हे लोक संविधानाला मानत नाहीत. उलट मोदीजी संविधानाला अधिक सन्मान देतात. खासदार महेश जेठमलानी म्हणाले, सेंगोल हे देशाचे प्रतिक आहे. सेंगोल स्थापन करण्यात आले, ते आता कुणही हटवू शकत नाही.

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी म्हणाले, ही लोक अशीच सर्व कामे करतात. हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. हे लोक प्रसिद्धीसाठी असे बोलतात. आपण सर्वच जण संविधानाला मानतो. एकट्या समाजवादी पक्षाने संविधानाचा ठेका घेतलेला नाही.

टॅग्स :ParliamentसंसदSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपा