केजरीवालांच्या सम-विषम फॉर्म्युल्यावर नितीन गडकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 15:13 IST2019-09-13T15:11:19+5:302019-09-13T15:13:38+5:30

'आमच्या योजनामुळे दिल्ली प्रदूषण मुक्त होईल'

No Need for It Right Now: Nitin Gadkari Dismisses Kejriwal’s Odd-Even Idea to Combat Delhi Pollution | केजरीवालांच्या सम-विषम फॉर्म्युल्यावर नितीन गडकरी म्हणाले...

केजरीवालांच्या सम-विषम फॉर्म्युल्यावर नितीन गडकरी म्हणाले...

नवी दिल्ली : प्रदूषण आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर उपाय म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पुन्हा सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सम-विषम फॉर्म्युला 4 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान लागू होणार आहे. या व्यतिरिक्त, प्रदूषणमुक्तीसाठी त्यांनी 7 सूत्रीय कृती कार्यक्रमाचीही घोषणा केली आहे.

यावर केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. नितीन गडकरी म्हणाले, "याची गरज असल्याचे मला वाटत नाही. आम्ही जो रिंग रोड तयार केला आहे, त्यामुळे शहरातील प्रदूषण मोठ्याप्रमाणात कमी झाले आहे. पुढील दोन वर्षांत आमच्या योजनामुळे दिल्ली प्रदूषण मुक्त होईल." 

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात दिल्लीच्या आसपासच्या राज्यात गवत जाळले जाते. त्यामुळे दिल्लीत मोठ्याप्रमाणत प्रदूषण होते. या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पुन्हा सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षांमध्ये नोव्हेंबर महिन्यात सम-विषम फॉर्म्युला लागू केल्यामुळे राज्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अजून प्रदूषण कमी करण्याचा दिल्ली सरकारचा प्रयत्न असणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यासंदर्भात जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. तसेच, एक्सपर्ट्ससोबत चर्चा केली होती. दिवाळीत फटाक्यांमुळे धूराचे प्रमाण वाढते. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना आवाहन आहे की, फटाके फोडू नका. सुप्रीम कोर्टाचाही तसा आदेश आहे. याशिवाय, प्रदूषण संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी वॉररुम सुद्धा तयार करण्यात येणार आहे, असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

कोणत्या तारखेला सम-विषम असणार?
दिल्ली सरकारने तयार केलेल्या फॉर्म्युल्यानुसार सम नंबरच्या गाड्या ५, ७, ११, १३, आणि १५ तारखेला रस्त्यांवर असतील, तर विषम नंबरच्या गाड्या ४, ६, ८, १२ आणि १४ तारखेला रस्त्यांवर धावू शकणार आहेत.
 

Web Title: No Need for It Right Now: Nitin Gadkari Dismisses Kejriwal’s Odd-Even Idea to Combat Delhi Pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.