कितीही एकत्र आले तरी वाघाचा मुकाबला नाहीच, फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 10:30 AM2022-11-23T10:30:34+5:302022-11-23T10:30:58+5:30

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. त्यांचे ते स्वप्न गुजरातने २७ वर्षांपूर्वी साकार केले आणि भाजपच्या हाती सत्ता दिली, यावेळीही त्याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No matter how many come together, there is no match for the tiger, says Fadnavis | कितीही एकत्र आले तरी वाघाचा मुकाबला नाहीच, फडणवीसांचा हल्लाबोल

कितीही एकत्र आले तरी वाघाचा मुकाबला नाहीच, फडणवीसांचा हल्लाबोल

Next

बायाद (जि. साबरकांठा) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी काल गुजरातमध्ये येऊन गेले, ते काय बोलले कोणाला काही कळले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाघ आहेत आणि कितीही प्राणी एकत्र आले तरी वाघाचा मुकाबला शक्य नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गुजरातमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये केला. 

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. त्यांचे ते स्वप्न गुजरातने २७ वर्षांपूर्वी साकार केले आणि भाजपच्या हाती सत्ता दिली, यावेळीही त्याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी बायाद, प्रांतिज, मणीनगर विधानसभा मतदारसंघांत फडणवीस यांच्या भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा झाल्या.  यावेळी गुजरातमध्ये भाजप विजयाचा नवीन विक्रम स्थापित करणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Web Title: No matter how many come together, there is no match for the tiger, says Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.