शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

No Confidence Motion : पंतप्रधान मोदी चौकीदार नाहीत, तर भागीदार!; राहुल गांधींचा 'स्ट्राइक'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 1:59 PM

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती आरोप केला.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्योगपतींशी संबंध आहेत, हे सगळ्या देशानं पाहिलंय. मोदींच्या मार्केटिंगवर होणारा खर्च तेच करताहेत आणि मोदीही त्यांच्यासाठीच सगळं करताहेत. गरीबांबद्दल त्यांच्या मनात थोडीशीही जागा नाही. म्हणूनच, कधीही हेलिकॉप्टर न बनवलेल्या माणसाला त्यांनी राफेल करारामध्ये ४५ हजार कोटींचा फायदा करून दिलाय. ते चौकीदार नाहीत, तर भागीदार आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केला. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी मोदींसह संरक्षणमंत्री निर्मला सितारामन, अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही लक्ष्य केलं. त्यावरून सत्ताधारी खासदार संतापले आणि सभागृहात गदारोळ झाला. 

राहुल गांधींच्या भाषणातील मुद्देः

>> मी देशाचा चौकीदार आहे, चौकीदारी करेन असं मोदी म्हणतात. पण त्यांच्या मित्राच्या मुलाची संपत्ती १६ हजार पटींनी वाढते, तेव्हा त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नाही >> यूपीएच्या काळात राफेल करारात प्रत्येक हेलिकॉप्टरची किंमत ५२० कोटी ठरली होती. पण काहीतरी जादू झाली आणि ती १६०० कोटी रुपये झाली.>> पंतप्रधान फ्रान्सला गेले होते. ते कुणासोबत गेले हे देशाला माहीत आहे. >> राफेल करारातील आकडे मी सांगू शकत नाही, तशी अटच करारात आहे, असं संरक्षणमंत्री म्हणाल्या होत्या.>> मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटलो तेव्हा ते म्हणाले, पूर्ण देशाला किंमत सांगा, माझी काहीच हरकत नाही. >> पंतप्रधानांच्या दबावाखाली येऊन निर्मला सीतारामन खोटं बोलल्या. कुणाची मदत होतेय, ती का केली जातेय हे देशाला सांगा.>> देशातील २०-२५ उद्योगपतींचं अडीच लाख कोटींचं कर्ज सरकारने माफ केलं, पण शेतकऱ्यांचं केलं नाही.>> शेतकऱ्यांनी हात जोडून विनंती केली होती. पण, तुमच्यात शक्ती नाही, तुमच्यात दम नाही, सूट-बूट घालत नाही ना!>> पेट्रोलचे दर जगात खाली येताहेत, पण भारतात वाढतच जाताहेत. कारण, नरेंद्र मोदी आपल्या मित्रांच्या खिशात पैसे टाकू इच्छितात. >> मी बोलत असताना पंतप्रधान माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हते, हे देशाने पाहिलं आहे. ते चौकीदार नाहीत, भागीदार आहेत.

...

>> शेतकरी, तरुण, दलित, महिला आणि आदिवासी हे मोदी सरकारच्या 'जुमला स्ट्राइक'चे बळी>> पंतप्रधानांच्या शब्दाला काही अर्थ आहे की नाही, हा प्रश्न आज सगळा देश विचारतोय. >> प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये - जुमला स्ट्राइक नंबर १>> दोन कोटी युवकांना दरवर्षी रोजगार - जुमला स्ट्राइक नंबर २ >> तरुणांनी पंतप्रधानांवर विश्वास ठेवला होता. पण फक्त चार लाख तरुणांना रोजगार मिळालेत. >> चीनमध्ये २४ तासांत ५० हजार तरुणांना रोजगार मिळतो, आपल्याकडे ४०० तरुणांना मिळतोय.>> जिकडे जातात तिकडे पकोडे बनवा, दुकानं उघडा असे सल्ले देतात. >> चीन दौऱ्यात डोकलामवर चर्चा न करून पंतप्रधानांनी जवानांचा विश्वासघात केला.

 

 

 

 

 

 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसArun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपा