उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 06:01 IST2026-01-06T06:00:04+5:302026-01-06T06:01:29+5:30
खालीद व इमाम याच्यासह इतरांनी ‘शांततेच्या मार्गाने विरोध’ करण्याच्या आडून सत्ता परिवर्तनाचे अभियान चालवले व देशाच्या अखंडतेवरच हल्ला करण्याचा कट रचला

उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीत उमर खालीद आणि शरजिल इमाम यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होते, या निष्कर्षावर येत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दोघांचाही जामीन फेटाळून लावला. इतर पाच आरोपींना मात्र सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
दंगलीत ५३ मृत्यू
दिल्लीत २८ जानेवारी २०२० रोजी नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधातील निदर्शनावेळी केलेल्या भाषणांवरून शरजील इमामला अटक करण्यात आली. याच आरोपावरून खालीदसह इतरांना अटक झाली होती.
दिल्ली पोलिसांची भूमिका
खालीद व इमाम याच्यासह इतरांनी ‘शांततेच्या मार्गाने विरोध’ करण्याच्या आडून सत्ता परिवर्तनाचे अभियान चालवले व देशाच्या अखंडतेवरच हल्ला करण्याचा कट रचला, अशी भूमिका दिल्ली पोलिसांनी मांडली होती.
गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी महाधिवक्ता तुषार मेहता, आरोपींच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद ऐकल्यावर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.