नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 07:11 IST2025-11-14T07:09:35+5:302025-11-14T07:11:37+5:30
Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यातील सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हे ठरवण्यासाठी सुमारे ५ कोटी मतदारांनी दिलेला कौल काही वेळातच समोर यायला सुरुवात होणार आहे.

नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यातील सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हे ठरवण्यासाठी सुमारे ५ कोटी मतदारांनी दिलेला कौल काही वेळातच समोर यायला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून, संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा राखण्यासाठी निर्देश दिले आहेत.
- सकाळी ८ वाजता पोस्टल मतदानाची मोजणी सुरुवातीला होणार
-सकाळी ८.३० वाजता ईव्हीएमद्वारे मतदानाची मोजणी सुरू होणार
- ४६ मतमोजणी केंद्रे
- २,६१६ उमेदवार रिंगणात आहेत
- एकूण मतदान ६७.१३ टक्के
पोल ऑफ पोल्स
एनडीए १५४
महाआघाडी ८४
अन्य ५
२०१५ आणि २०२० मध्ये एक्झिट पोलचे सर्व अंदाज सपशेल खोटे ठरले होते.
बिहार विधानसभा २०२० मधील पक्षीय बलाबल
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. या निवडणुकीत मतदानाचा नवा विक्रम नोंदवला गेला. दोन्ही टप्प्यांत मिळून तब्बल ६७.१३ टक्के विक्रमी मतदान झाले. बिहारमध्ये एकूण ७,४५,२६,८५८ मतदार असून, यापैकी ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता. आता या विक्रमी मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
