शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नितीश कुमार मुख्यमंत्री होण्यास अनुत्सुक : जदयूच्या खराब कामगिरीमुळे नाराज; भाजप नेत्यांनी समजावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 3:32 PM

243 सदस्य असलेल्या बिहारमध्ये एनडीएला 125 जागा मिळ्या आहेत. यात भाजपच्या पारड्यात 74 जागा आल्या आहेत. तर जदयूला 43, व्हीआयपी आणि हमला प्रत्येकी चार-चार जागा मिळाल्या आहेत. 

ठळक मुद्दे243 सदस्य असलेल्या बिहारमध्ये एनडीएला 125 जागा मिळ्या आहेत.भाजपच्या पारड्यात 74 जागा आल्या आहेत. तर जदयूला 43, व्हीआयपी आणि हमला प्रत्येकी चार-चार जागा मिळाल्या आहेत. नितीश यांनी जनता आणि पंतप्रधानांचे मानले आभार.

पाटणा - बिहारमध्ये एनडीएला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या असतानाही, नितीश कुमारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे म्हटले होते. मात्र, भाजप नेत्यांनी नितीश कुमारांना समजावले असून सलग चौथ्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी राजी केले आहे. नितीश कुमार हे निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या खराब कामगिरीमुळे नाराज आहेत.  आपल्या इच्छेनुसार सरकार चालवा - भाजपाइंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 'नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे दर्शवल्यानंतर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यास राजी केले आहे. एवढेच नाही, तर ते पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे सरकार चालवू शकतील, असे आश्वासनही भाजप नेत्यांनी नितीश यांना दिले आहे.

नितीश यांनी जनता आणि पंतप्रधानांचे मानले आभार -नितीश कुमार बुधवारी एक ट्विट करून म्हणाले, 'जनता सर्वोपरी आहे. एनडीएला बहुमत दिल्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही मी सातत्याने समर्थनासाठी आभार मानतो.'

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

चिरागनं बिघडवलं जदयूचं गणित -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग पासवानांनी आणि त्यांच्या लोजपाने जदयू आणि नितीश कुमारांना चांगलेच काळजीत टाकले होते. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे, 'ते (नितीश कुमार) अत्यंत तणावात होते, की चिरागने किमात 25 ते 30 जागांवर जदयूच्या विजयाची शक्यता बिघडवली. आम्ही त्यांना मुख्यमंत्री राहण्यासाठी राजी केले आहे. मात्र, आता भाजप आघाडीतील मोठा भागिदार आहे.' 

243 सदस्य असलेल्या बिहारमध्ये एनडीएला 125 जागा मिळ्या आहेत. यात भाजपच्या पारड्यात 74 जागा आल्या आहेत. तर जदयूला 43, व्हीआयपी आणि हमला प्रत्येकी चार-चार जागा मिळाल्या आहेत. 

बिहारसह 10 राज्यांत #ModiSuperWave; लॉकडाउनच्या त्रासाचं रुपांतर मोदी प्रेमात का झालं?

2005 नंतरची सर्वात वाईट कामगिरी -  यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जदयूला 43 जागा मिळाल्या आहेत. 2005च्या विधानसभा निवडणुकीनंतर ही पक्षाची सर्वात वाईट कामगिरी आहे. 2015च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला 71 जागांवर विजय मिळवला होता.  

वरिष्ठ भाजप नेत्यांनी घेतली नितीश कुमारांची भेट-बिहारमधील वरिष्ठ भाजप प्रभारी भूपेंद्र यादव, बिहार भाजप अध्यक्ष डॉ. संजय जैस्वाल, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी सायंकाळी नीतीश कुमार यांची भेट घेतली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा