शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 16:10 IST

Nitish Kumar son Nishant Kumar in Bihar Politics: निशांत कुमार हे राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. पण नुकतीच एक अशी गोष्ट घडली ज्याने या चर्चांना खतपाणी मिळाले.

Nitish Kumar son Nishant Kumar in Bihar Politics: आगामी २०२५च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार आपला मुलगा निशांत कुमार यांना लॉन्च करू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, पक्ष विस्ताराच्या दृष्टीने नितीशकुमार हे पाऊल उचलतील असे बोलले जात आहे. निशांत हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या सक्रिय राजकारणात प्रवेशाच्या वृत्ताने लालू प्रसादांच्या आरजेडीला धक्का बसला आहे. निशांत कुमार हे सहसा राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. निशांत क्वचित प्रसंगी वडील नितीश कुमार यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसतात. पण सीएम नितीश कुमार नुकतेच मुलगा निशांतसोबत हरयाणात गेले, तेव्हापासून या चर्चांना उधाण आले आहे.

निशांत कुमारच का?

निशांत कुमार यांना JDU मध्ये सक्रिय करावे आणि त्यासाठी त्यांना पक्षात काही पद द्यावे, अशी मागणी काही JDU नेत्यांनी आधीच मांडली होती. वास्तविक, ७३ वर्षीय नितीश कुमार यांनी 'पक्षांतर्गत मागण्या' कधीच मान्य केल्या नाहीत. परंतु ताज्या घडामोडींनुसार, वय आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता नितीश कुमार पक्षातील मागण्यांशी सहमत होऊ शकतात, असे बोलले जात आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांतच निशांत औपचारिकपणे जेडीयूमध्ये प्रवेश करतील. कारण सध्याच्या घडीला नितीश कुमार यांच्यानंतर त्यांची जागा घेऊ शकेल, असे जेडीयूकडे दुसरे नेतृत्व नाही.

लालूंना टक्कर देणारा नितीश यांचा प्लॅन

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत जेडीयूसमोर अनेक आव्हाने आहेत. विशेषत: लालू यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासारख्या विरोधी नेत्यांचा पराभव करण्यासाठी नितीश यांनी आपल्या मुलाला राजकारणात आणले, तर ती जेडीयूसाठी नवी सुरुवात ठरू शकते. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश यांच्याकडे जेडीयूला वाचवण्याचा हा शेवटचा पर्याय आहे. निशांत यांना राजकारणात सक्रीय करून ते लालूंसोबतच्या लढाईला सामोरे जाऊ शकतील आणि जेडीयूदेखील जोरदारपणे पुढे जाऊ शकेल.

 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलJanta Dal Unitedजनता दल युनायटेड