शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार यांचं ‘ऑपरेशन तीर’! राजद, काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; १३ आमदार जदयूमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:05 IST

जदयू ऑपरेशन तीरच्या माध्यमातून बिहारमधील सर्वांत मोठा पक्ष होऊ इच्छित आहे.

एस. पी. सिन्हा / विभाष झा पाटणा : बिहारमधील दारुण पराभवातून लालू कुटुंब अद्याप सावरलेले नसतानाच राजद फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. सूत्रांनी सांगितले की, जदयूचे ऑपरेशन तीर सुरू झाले असून, राजदबरोबरच काँग्रेस, एमआयएम व बसपामध्येही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

राजदच्या २५ पैकी १३ आमदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या मन:स्थितीत आहेत. परंतु पक्षबदल कायद्यापासून वाचण्यासाठी आणखी आमदारांना फोडण्याची तयारी सुरू आहे. पक्षबदल कायद्यानुसार, दोन-तृतीयांश आमदार फुटणे गरजेचे आहे. अन्यथा आमदारकी जाऊ शकते. म्हणजेच राजदचे १९ आमदार फुटल्यासच काम फत्ते होणार आहे. जदयूने त्यांना आकर्षित करण्यासाठी सहा मंत्रिपदे रिक्त ठेवली आहेत.

बिहारमध्ये एकूण ३६ मंत्रिपदे आहेत. मुख्यमंत्र्यांसह केवळ २७ जणांनी शपथ घेतली. जदयू ऑपरेशन तीरच्या माध्यमातून बिहारमधील सर्वांत मोठा पक्ष होऊ इच्छित आहे. पक्षाचा संख्येच्या बाबतीत भाजपपेक्षा वरचढ ठरण्याचा मानस आहे. 

सर्वांसाठी दारे खुलीजे नितीशकुमार यांच्यासमवेत येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी दारे खुली आहेत. आम्हाला गरज नाही. परंतु कोणी येऊ इच्छित असेल तर नकारही देणार नाही.नीरज कुमार, प्रवक्ता, जदयू 

सर्व आमदार एकजूटराजदमध्ये कोणीही नाराज नाही. सर्व नेते तेजस्वी यादव यांच्याशी प्रामाणिक आहेत. आमदारांमध्ये फुटीची चर्चा निरर्थक आहे. - चित्तरंजन गगन, प्रवक्ते, राजद.

नितीशकुमार यांचा पवित्रानितीशकुमार एनडीएमध्ये पुन्हा मोठा भाऊ होऊ इच्छितात. २०२०पासून भाजप या भूमिकेत आहे. एमआयएम आमदारांसमोर पर्याय नाही. कारण राजदच खूप कमकुवत आहे. काँग्रेसमधील आमदार जदयूमध्ये जाण्यास तयार आहेत. पुन्हा सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सक्रियता वाढली.

यापूर्वीही काँग्रेसमध्ये फूटनितीशकुमार २०१७मध्ये महाआघाडीतून वेगळे होऊन एनडीएमध्ये परतले होते, तेव्हा तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी, तीन आमदारांसह अनेक नेते घेऊन जदयूमध्ये गेले होते. अशोक चौधरी यांना नितीशकुमार यांनी कॅबिनेटमंत्री केले होते. त्या बदल्यात त्यांनी काँग्रेसच्या १३ नेत्यांना जदयूमध्ये नेले होते.

विरोधी पक्षनेते पदही राहणार नाही...राजदमध्ये फाटाफूट झाल्यास तेजस्वी यादव विरोधी पक्षनेतेही होऊ शकणार नाहीत. सभागृहात १० टक्के सदस्य असल्यास हे पद मिळते. म्हणजे हे पद मिळविण्यासाठी २४३ पैकी २४ आमदार असणे गरजेचे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nitish Kumar's 'Operation Arrow': RJD, Congress on verge of split?

Web Summary : Bihar's RJD faces a potential split as JDU launches 'Operation Arrow'. Thirteen RJD legislators may defect, needing 19 for legal validity. JDU aims to become Bihar's largest party, offering ministerial posts to attract members from RJD, Congress, and others, while RJD denies discord.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहारBJPभाजपा