नितीश कुमार अन् चिराग यांनी वक्फ विधेयकावरील सस्पेन्स वाढवला, विरोधकांची चिंता वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:08 IST2025-04-01T14:05:43+5:302025-04-01T14:08:20+5:30
दोन्ही पक्षांनी विधेयकाबाबत त्यांचे कार्ड उघड केलेले नाहीत, परंतु संकेत देऊन विरोधकांचा ताण वाढवला आहे.

नितीश कुमार अन् चिराग यांनी वक्फ विधेयकावरील सस्पेन्स वाढवला, विरोधकांची चिंता वाढवली
वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाऊ शकते. त्याआधी, सरकार आणि विरोधी पक्ष आपापली फिल्डिंग लावत आहेत. विरोधकांनीही मोठी तयारी सुरू केली आहे. विधेयक थांबवण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी विधेयक पास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, एनडीएमधील भाजपचे मित्रपक्ष जेडीयू आणि चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपी-आर यांनी सस्पेन्स वाढवला आहे.
दोन्ही पक्षांनी विधेयकाबाबत त्यांचे कार्ड उघड केलेले नाहीत, पण संकेत देऊन विरोधकांचा ताण वाढवला आहे. चिराग आणि नितीश यांच्या पक्षाने म्हटले की, विरोधी पक्ष मुस्लिमांची दिशाभूल करत आहे. लोकांनी असे घाबरू नये. जेडीयूचे एमएलसी गुलाम गौस यांनी या विधेयकाला उघडपणे विरोध केला आहे आणि मोदी सरकारला ते मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
"उत्तराखंडचं नावही उत्तर प्रदेश-2 करून टाका"; अखिलेश यादव CM धामींवर इतके का भडकले?
गुलाम गौस म्हणाले की, माझ्या मते हे विधेयक ताबडतोब मागे घेतले पाहिजे. शेतकरी आंदोलन झाले तेव्हा अनेक लोक मारले गेले आणि शेवटी देशाच्या हितासाठी हे विधेयक मागे घेण्यात आले. आता जेव्हा शेतकरी विधेयक मागे घेता येते तेव्हा वक्फ विधेयक का मागे घेता येत नाही? गुलाम गौस म्हणाले की, माझा पक्ष पाठिंबा देत आहे असा दावा करता येणार नाही. आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काहीही सांगितले नाही. सध्या तरी ते मागे घ्यावे असे माझे वैयक्तिक मत आहे, असंही ते म्हणाले.
लल्लन सिंह यांनी यावर काहीही सांगितले नाही. ते म्हणाले की, आम्ही लोकसभेतच या विधेयकावर आमची भूमिका स्पष्ट करू. आम्हाला विरोधी पक्षाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. नितीश कुमार यांना काँग्रेसकडून प्रमाणपत्राची गरज नाही. त्यांनी स्वतःच्या आत डोकावून पाहिले पाहिजे की त्यांनी इतकी वर्षे राज्य केले, पण त्यांनी मुस्लिमांसाठी काय केले?, असा सवालही त्यांनी केला. मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी नितीश कुमार यांनी जे काम केले आहे ते देशातील कोणत्याही सरकारने केलेले नाही, असंही ते म्हणाले.