शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

मनातील खदखद डोळ्यांतील अश्रूंमध्ये दिसली, उपमुख्यमंत्र्यांचा कंठ दाटला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 3:27 PM

उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज भुपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते भावूक झाल्याचं दिसून आलं. मी भाजपमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काम करत आहे.

ठळक मुद्देभूपेंद्र पटेल हे गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून आज दुपारी शपथ घेणार आहेत. पुढच्या वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विजय मिळणे शक्य नाही, असा निष्कर्ष पक्षाच्या सर्वेक्षणातून समोर आला होता.

अहमदाबाद - पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्य भाजप विधिमंडळ पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. पटेल आज, सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे, गणेशोत्सवातही पटेल यांच्याघरी दिवाळीचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या नितीन पटेल यांच्या मनातील वेदना अश्रुंमधून बाहेर पडल्या आहेत. 

विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला होता. नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. भूपेंद्र पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. पटेल यांच्या निवडीच्या घोषणेनंतर त्यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी नातेवाईक, शेजारी आणि मित्र परीवाराने गर्दी केली होती. तसेच, या निवडीचे सेलिब्रेशनही करण्यात आले. आमच्यासाठी ही अनपेक्षित सरप्राईज आहे. त्यामुळेच, घरी दिवाळीसारखं वातावरण बनलंय, असे भूपेंद्र यांच्या पत्नी हेतल पटेल यांनी म्हटलं आहे. 

उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज भुपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते भावूक झाल्याचं दिसून आलं. मी भाजपमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काम करत आहे. पक्षाने गेल्या 30 वर्षात मला भरपूर दिलंय. नरेंद्र मोदी, आनंदी बेन आणि विजय रुपाणी यांच्या कॅबिनेटमध्येही मला संधी मिळाली. त्यामुळे, मी अजिबात नाराज नसून भुपेंद्र पटेल यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध असल्याचंही त्यांनी म्हटलं. मात्र, हे बोलत असताना त्यांच्या मनातील खदखद ही डोळ्यांतील अश्रूंमध्ये दिसून आली. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून आज दुपारी शपथ घेणार आहेत. पुढच्या वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विजय मिळणे शक्य नाही, असा निष्कर्ष पक्षाच्या सर्वेक्षणातून समोर आला होता. पक्षात रुपानी यांच्याविषयी नाराजी होती. ते राज्यातील कोरोना स्थिती नीटपणे हाताळण्यात अयशस्वी ठरल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास श्रेष्ठींनी सांगितले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव विजय रुपानी यांनीच मांडला व तो एकमताने संमत झाला.

भाजपचे धक्कातंत्र कायम 

- गुजरातचे भावी मुख्यमंत्री म्हणून मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांसह काही जणांची नावे शर्यतीत होती. भूपेंद्र पटेल यांचे नाव अजिबात चर्चेत नव्हते. अशाच नावाची निवड करून भाजपचे आपले धक्कातंत्र कायम ठेवले आहे. 

टॅग्स :Nitin Patelनितीन पटेलChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातBhupendra Patelभूपेंद्र पटेल