शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

सरकार फुकट पगार द्यायला बसलंय का?; गडकरी सरकारी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 3:44 PM

Nitin Gadkari angry over government officials: गायी-म्हैशीचं उदाहरण देत गडकरींनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर; थेट पगारच काढला

सरकारी काम आणि वर्षानुवर्षे थांब असं म्हटलं जातं. सरकारी कर्मचारी म्हटलं की ढिलाई ठरलेलीच, असं आपण अनेकदा ऐकतो. अनेकांनी याचा अनुभवदेखील घेतला असेल. अशाच अधिकाऱ्यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) चांगलंच फैलावर घेतलं. एमएसएमई विभागाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या गडकरींना सरकारी अधिकाऱ्यांच्या ढिलाईचा अनुभव आला. त्यामुळे नाराज झालेल्या गडकरींनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. (Nitin Gadkari angry over government officials)नितीन गडकरी स्वत: कोणती कार वापरतात? डिझेल की ईलेक्ट्रीक...बुधवारी एमएसएमई विभागाच्या तंत्रज्ञान केंद्राचं उद्घाटन होतं. त्यामध्ये नितीन गडकरी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेक अधिकारीदेखील हजर होते. अधिकाऱ्यांच्या कामाची शैली पाहून नाराज झालेल्या गडकरींनी त्यांना पगाराची आठवण करून दिली. यावेळी गडकरींनी अधिकाऱ्यांना गाय-म्हशीचं उदाहरण दिलं. 'आपण गायी-म्हशी पाळतो. त्यांनी जास्त दूध द्यावं यासाठी त्यांना चांगला आहार देतो. पण चांगला आहार खायला घालूनसुद्धा दूधच मिळत नसेल, तर मग अशा जनावरांचा काय उपयोग?,' असा सवाल गडकरींनी उपस्थित केला....तर नव्या कारवर मिळणार ५ टक्के घसघशीत डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणासरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे संतापलेल्या गडकरींनी पुढे बोलताना अधिकाऱ्यांच्या आवश्यकतेवरच बोट ठेवलं. 'सरकारनं तुम्हाला फुकट पगार द्यायचा का? इतक्या अधिकाऱ्यांची, त्यांच्यावर गुंतवणूक करण्याची गरजच काय?,' असे प्रश्न गडकरींनी उपस्थित केले.सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशैली आणि कार्यक्षमतेवर याआधीही नितीन गडकरींनी नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एनएचएआयच्या इमारतीचं उद्घाटन झालं. त्या कार्यक्रमाला गडकरी उपस्थित होते. त्यावेळीही गडकरींनी संताप व्यक्त केला होता. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी-१ सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या इमारतीचं काम भाजप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी-२ सरकारच्या काळात पूर्ण झालं. त्यावर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो अशा कार्यालयांमध्ये लावायला हवेत, असं गडकरी म्हणाले होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी