...तर नव्या कारवर मिळणार ५ टक्के घसघशीत डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 08:55 AM2021-03-08T08:55:33+5:302021-03-08T08:59:58+5:30

Nitin Gadkari On new scrap policy: नवी कार खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी खूशखबर; नितीन गडकरींकडून महत्त्वाची घोषणा

Junk Your Old Car Get About Five Percent Discount On New Purchases | ...तर नव्या कारवर मिळणार ५ टक्के घसघशीत डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणा

...तर नव्या कारवर मिळणार ५ टक्के घसघशीत डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणा

Next

नवी दिल्ली: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी जुनी कार स्क्रॅप करण्याची तयारी असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. जुनी कार स्क्रॅप केल्यास नवी कार खरेदी करताना जवळपास ५ टक्क्यांची सवलत देण्याची घोषणा नितीन गडकरींनी केली आहे. जुनी कार स्क्रॅप करण्याच्या बदल्यात वाहन कंपन्या ग्राहकांना नव्या कार खरेदीवेळी जवळपास ५ टक्के सूट देतील, असं गडकरींनी सांगितलं.

"FASTag मुळे 20 हजार रुपयांपर्यंत बचत होईल इंधनावरील खर्च, महसूलही वाढेल"

वाहनांना स्वेच्छेनं स्क्रॅप करण्याचं धोरण मोदी सरकारनं आणलं आहे. त्याची घोषणा २०२१-२२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली. या धोरणाबद्दल गडकरींनी अधिक माहिती दिली. 'स्क्रॅप धोरणाचे चार प्रमुख घटक आहेत. सवलतीसोबतच प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर हरित कर आणि अन्य शुल्क आकारण्याची तरतूद यात आहे. त्यांना फिटनेस आणि प्रदूषण चाचणी करून घ्यावी लागेल. त्यासाठी देशात सेल्फ ड्राईव्ह फिटनेस केंद्रांची आवश्यकता भासेल. आम्ही त्या दिशेनं काम करत आहोत,' असं गडकरींनी सांगितलं.

मस्तच! आता घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या डिटेल्स

सेल्फ ड्राईव्ह परीक्षा पास न करणाऱ्या गाड्यांना दंड
सेल्फ ड्राईव्ह फिटनेस चाचण्या सार्वजनिक खासगी भागिदारीच्या (पीपीपी) माध्यमातून घेतल्या जातील. सरकार खासगी भागिदारांना आणि राज्य सरकारांना स्क्रॅसाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारण्यास सहकार्य करेल. सेल्फ ड्राईव्ह चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्या वाहनांकडून दंड आकारला जाईल. हे धोरण वाहन क्षेत्रासाठी वरदान ठरेल. याचा लाभ वाहन क्षेत्राला होईल. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read in English

Web Title: Junk Your Old Car Get About Five Percent Discount On New Purchases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.