शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

निठारी हत्याकांड - विशेष सीबीआय कोर्टाने मनिंदर सिंग आणि सुरिंदर कोलीला नवव्या केसमध्ये ठरवलं दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 1:35 PM

नोएडाच्या बहुचर्चित निठारी हत्याकांडाच्या नवव्या केसमध्ये विशेष सीबीआय कोर्टाने मनिंदर सिंग आणि सुरिंदर कोली या दोघांना दोषी ठरवलं आहे.

ठळक मुद्देनोएडाच्या बहुचर्चित निठारी हत्याकांडाच्या नवव्या केसमध्ये विशेष सीबीआय कोर्टाने मनिंदर सिंग आणि सुरेंद्र कोली या दोघांना दोषी ठरवलं आहे. सीबीआय कोर्टाकडून 8 डिसेंबर रोजी या दोघांना शिक्षा सुनावली जाऊ शकते.

नवी दिल्ली- नोएडाच्या बहुचर्चित निठारी हत्याकांडाच्या नवव्या केसमध्ये विशेष सीबीआय कोर्टाने मनिंदर सिंग आणि सुरिंदर कोलीला या दोघांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणावरील शेवटची सुनावणी बुधवारी झाली होती. सीबीआय कोर्टाकडून 8 डिसेंबर रोजी या दोघांना शिक्षा सुनावली जाऊ शकते. सीबीआय कोर्टाने या दोघांना कलम 302, कलम 376 आणि कलमत 364 अंतर्गत दोषी ठरवलं आहे. 

 

याआधी बुधवारी अंतिम सुनावणीसाठी गाझियाबादच्या डासना तुरूंगात शिक्षा भोगत असणारा सुरिंदर कोलीला सीबीआयचे विशेष न्यायाधीस पवन कुमार तिवारी यांच्या समोर हजर करण्यात आलं होतं. निठारी हत्याकांडात मनिंदर सिंग आणि  सुरिंदर कोली या दोघांवर एकुण 16 केसेस सुरू आहेत. यापैकी 8 केसेसवर सीबीआयच्या विशेष कोर्टाने निर्णय दिलेला आहे. 

काय आहे निठारी हत्याकांड ?20 जून 2005 रोजी नोएडाच्या निठारी भागातून एक आठ वर्षाची मुलगी अचानक गायब झाली. या घटनेनंतर निठारी भागातून एकामागे एक अशी लहान मुलं गयाब व्हायला लागली. मुलं गायब होण्याची ही घटना एक वर्षभर सुरू होती. वर्षभरात जवळपास बारा लहान मुलं गायब झाली. यानंतर पोलिसांनी एक मोठ सर्च ऑपरेशन सुरू केलं. 

7 मे 2006 रोजी एक 21 वर्षीय मुलगी निठारी भागातून गायब झाली. त्यावेळी त्या मुलीच्या मोबाईलमधून पोलिसांना महत्त्वाचा सुगावा लागला.मुलीच्या मोबाइलमधील कॉल डिटेल्सची पोलिसांनी तपासणी केली. या तपासणीमध्ये मनिंदर सिंगचं नाव समोर आलं होतं. यानंतर पोलीस तपासात पूर्ण निठारी प्रकरणाचा खुलासा झाला. ज्यामध्ये 15 पेक्षा जास्त लहान मुली आणि तरूणींवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह मनिंदरने घरात गाडले होते. 29 डिसेंबर 2006 रोजी पोलिसांना मनिंदरच्या नोएडातील घरात 19 मानवी सांगाडे सापडले होते. 

निठारी हत्याकांडाच्या सहा केसेसमध्ये कोर्टाने सुरिंदर कोलीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कोर्टाने कोलीला एका मुलीच्या हत्येप्रकरणात तसंच अपहरण, बलात्कार आणि पुरावे मिटविण्याच्या आरोपात दोषी ठरवलं. त्याआधी पाच केसेसमध्ये सीबीआय कोर्टाने कोलीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा दिली आहे. दरम्यान, 2015मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली होती. 

टॅग्स :Nithari killingsनिठारी हत्याकांडCrimeगुन्हाCourtन्यायालय