शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पीएनबी घोटाळा लपवण्यासाठी नीरवनं नेमकं काय काय केलं? वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 1:59 AM

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील महत्त्वपूर्ण माहिती सीबीआयच्या तपासातून समोर

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) १३,४00 कोटी रुपयांचा महाघोटाळा करणारा आरोपी तथा कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी याने आपला गुन्हा लपविण्यासाठी आपल्या तीन कंपन्यांची भागीदारी रचना बदलली होती, अशी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली.सूत्रांनी सांगितले की, याच तीन कंपन्यांनी ‘लेटर्स ऑफ अंडरटेकिंग’च्या (एलओयू) माध्यमातून पीएनबीकडून ६,४९८ कोटी रुपये हडपले आहेत. जानेवारी २0१६ मध्ये नीरव मोदीने या कंपन्यांची भागीदारी रचना बदलली.नीरव मोदी याने डायमंड आर यूएस, सोलार एक्स्पोर्टस् आणि स्टेलर डायमंडस् या तीन कंपन्यांत डमी भागीदारांना बहुतांश भागधारक दाखविले. या बदलांची माहिती त्याने पीएनबीला दिली नाही. या कंपन्यांच्या नावे सुरत को-आॅपरेटिव्ह बँकेत त्याने नवी चालू खातीही काढली. ही खाती काढताना बहुतांश भागधारक म्हणून त्याने डमी संचालक दाखविले.या तिन्ही संस्था नीरव मोदी याच्या कुटुंबियांच्या मालकीच्या आहेत. त्यावर त्याचे स्वत:चे तसेच त्याच्या पत्नीचे नियंत्रण आहे. आपला घोटाळा लपविण्यासाठी त्याने जानेवारी २0१६ मध्ये प्रत्येक कंपनीत दोन डमी व्यक्ती भागीदार म्हणून दाखविल्या. भागीदारीचे करारपत्र स्वाक्षरित करून घेतले. या नव्या परंतु डमी भागीदारांना त्याने कंपन्यांतील बहुतांंश भागधारक म्हणून दाखविले. या तीन कंपन्यांच्या नावे १५0 बनावट एलओयू जारी करून नीरव मोदीने पीएनबी बँकेतून ६,४९८ कोटी रुपये उचलले. एक पैसाही नंतर त्याने बँकेत भरला नाही.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदी