Nirbhaya Case : घराला कुलूप लावून पवन जल्लादचे कुटुंबीय बेपत्ता; गायब होण्यामागे आहे एक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 14:44 IST2020-03-21T14:39:57+5:302020-03-21T14:44:17+5:30
Nirbhaya Case : फाशीची तयारी रात्री एक वाजता सुरू होत असे. फाशी देण्याआधी दीड तासआधी दोषींच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्यास सुरुवात होते.

Nirbhaya Case : घराला कुलूप लावून पवन जल्लादचे कुटुंबीय बेपत्ता; गायब होण्यामागे आहे एक कारण
नवी दिल्ली - निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्याच्या एक दिवस आधी पवन जल्लाद यांच्या घराला कुलूप होते. पवन दिल्लीच्या तिहार तुरूंगात आला होता. त्यामुळे त्याचे कुटुंब शेजार्यांना माहिती न देता इतरत्र गेले. घराला दोन दिवस कुलूप होते. शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्यांच्या वाहनातून पवनला त्याच्या घरी सोडले. शेजार्यांशी काहीही न बोलता पवन बंद घरात राहिला. यानंतर सकाळी पुन्हा एकदा घराला कुलूप लावून तो कुठेतरी निघून गेला. पवन जल्लादने आधीच हे सर्व करण्याची तयारी केली होती. हे करण्यामागील एक मोठे कारणही तो सांगतो.
Nirbhaya Case : शरीरावरील दातांच्या खुणा होत्या क्रूरतेच्या साक्षीदार ; 10 फोटोंमधून मिळाले पुरावे
Nirbhaya Case : निर्भयाचा तो मित्र, एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे परदेशात
Nirbhaya Case : मिळणाऱ्या पैशातून मुलीचे लग्न लावणार; जाणून घ्या पवन जल्लादचा पगार
तुरूंगातून आदेश, कोणाशीही बोलू नका
पवन जल्लादचे घर मेरठ येथील लोहिया नगर येथे कांशीराम दलित गृहनिर्माण योजनामध्ये आहे. शुक्रवारी सकाळी तिहार कारागृहात निर्भया सामूहिक बलात्कारातील चार गुन्हेगारांना फाशी देऊन पवन रात्री उशिरा घरी परतला. पवनचे शेजारी दिव्यांशू म्हणतात की, पोलिसांची गाडी त्याला घेऊन आली होती. रात्री अकराच्या सुमारास तो घरी आला. पुढे ते असेही म्हणाले की, तीन ते चार दिवस कोणाशीही बोलू नका. घरातच रहा. दोन दिवसांपूर्वी त्याचे कुटुंबही येथून निघून गेले. आज सकाळी पवनचा मुलगा आला. तो पवनसोबत निघून गेला. भगवत पुरा भूमिया पुलाजवळ त्याच्या कुटुंबाचे जुने घर आहे. दिव्यांशु असे सांगतात की, जेव्हा ते आधी तिहार तुरुंगात जात असत, तेथे त्यांना सांगण्यात आले की फाशी दिल्यानंतर तुम्हाला काही दिवस कोणालाही भेटायचे नाही. दिव्यांशु या वसाहतीच्या बाहेर सायबर कॅफे देखील चालवितात.
बरेच दिवस मनात फाशीचा विचार घोळत असतो
तिहार तुरुंगात जाण्यापूर्वी पवन जल्लादने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, फाशीची तयारी रात्री एक वाजता सुरू होत असे. फाशी देण्याआधी दीड तासआधी दोषींच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्यास सुरुवात होते. मी आजवर फाशी देताना नॉर्मल कोणाला पाहिले नाही. यानंतर, त्यांच्या चेहऱ्यावर काळा कपडा घालणे, दोरीने पाय बांधणे, गळ्यावर फाशीचा दोरखंड घालणे हे सर्व काम करावं लागतं. शेवटी खटका खेचून त्यांना फाशी दिली जाते.
पुढे पवन जल्लादाने सांगितले की, ५ तासांचे हे काम डोक्यात आणि मनात चिटकून बसतं की अनेक दिवस फासावर चढवतानाची प्रत्येक वस्तू डोळ्यांसमोर फिरत असते. गुन्हेगारांच्या डोळ्यात डोळे घालून मी पहिले त्यावेळी मी काय सांगू, किती संकटाला तोंड द्यावे लागले. खरं सांगायाचं झालं तर, यानंतर मला कोणाशीही बोलण्याची इच्छा नाही.