Nirbhaya Case : शरीरावरील दातांच्या खुणा होत्या क्रूरतेच्या साक्षीदार ; 10 फोटोंमधून मिळाले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:22 PM2020-03-21T12:22:24+5:302020-03-21T12:26:07+5:30

Nirbhaya Case : २० डिसेंबर २०१२ रोजी या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर चार दिवसानंतर तत्कालीन एसआय प्रतिभा शर्मा यांच्या आदेशानुसार छायाचित्रकाराने दातांची दहा मोठी छायाचित्रे घेतली.

Nirbhaya Case: The tooth marks on the body were witness to cruelty; Evidence from 10 photos pda | Nirbhaya Case : शरीरावरील दातांच्या खुणा होत्या क्रूरतेच्या साक्षीदार ; 10 फोटोंमधून मिळाले पुरावे

Nirbhaya Case : शरीरावरील दातांच्या खुणा होत्या क्रूरतेच्या साक्षीदार ; 10 फोटोंमधून मिळाले पुरावे

Next
ठळक मुद्दे१० पैकी ४ दातांच्या खुणांची ओळख पटविण्यात आली. या दातांच्या जखमांपैकी ३ जखमा राम सिंगच्या (तुरुंगात आत्महत्या केलेला दोषी)  तर १ दातांची खूण अक्षयची असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.दोषींनी पीडित महिला आणि तिच्या मित्राचे कपडे जाळले होते. पोलिसांनी असे अनेक पुरावे गोळा केले की ते दोषींना संपवण्यासाठी पुरेसे होते.

नवी दिल्ली - काल निर्भयाच्या मारेक्यांना फाशी देण्यात आली आहे. वसंत विहार पोलिसांनी कोर्टात आरोपींचे दुष्कर्म सिद्ध करण्यासाठी, पुरावे शोधण्यासाठी दिवस रात्र एक केली होती. निर्भयाच्या अंगावर अनेक दातांनी चावलेल्या जखमा आढळल्या. २० डिसेंबर २०१२ रोजी या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर चार दिवसानंतर तत्कालीन एसआय प्रतिभा शर्मा यांच्या आदेशानुसार छायाचित्रकाराने दातांची दहा मोठी छायाचित्रे घेतली.


कर्नाटकच्या धारवाड पोलिसांनी ही छायाचित्रे एसडीएम कॉलेज ऑफ डेंटल सायन्स येथे पाठविली. यासह पाच आरोपींच्या दातांचे नमुने देखील पाठविण्यात आले होते. फॉरेन्सिक ओंडोन्टोलॉजीच्या तंत्राच्या माध्यमातून आरोपींच्या दातांचे नमुने आणि निर्भयाच्या शरीरावर सापडलेल्या दातांच्या खुणा यांची एकत्रित पडताळणी करण्यात आली.

विश्लेषणामध्ये, १० पैकी ४ दातांच्या खुणांची ओळख पटविण्यात आली. या दातांच्या जखमांपैकी ३ जखमा राम सिंगच्या (तुरुंगात आत्महत्या केलेला दोषी)  तर १ दातांची खूण अक्षयची असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या संपूर्ण घटनेत हे दोन्ही पुरावे दोन आरोपींच्या दुष्कर्म उघडकीस आणण्यास पुरेसे होते. निर्भयाच्या शरीरावर वाढलेले दातांच्या खुणा आणि त्यासंबंधित पुरावे गोळा करण्यासाठी वसंत विहार पोलिसांनी अथक प्रयत्न केले. त्यामुळेच गुन्हेगारांना फाशीच्या तख्तावर पोचवू शकले.

याच आधारावर निर्भयाच्या शरीरावर दाताच्या सापडलेल्या खुणा राम सिंग आणि अक्षय यांच्या दात्यांच्या नमुन्याशी जुळल्या. वसंत विहार पोलीस ठाण्याचे तत्कालीन एसआय विशाल चौधरी यांनी दातांच्या खुनांचे छायाचित्रे घेऊन तज्ज्ञांकडे पोहोचले होते. पोलिसांनी या गोष्टींचा अगदी जवळून अभ्यास करण्यास सुरवात केली होती. परंतु त्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकांच्या दबावापासून दूर राहून निःपक्षपाती चौकशी अहवाल तयार करणे हे होते. तपासासाठी दोषींविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी डीएनए विश्लेषणही करण्यात आले होते. 

Nirbhaya Case : निर्भयाचा तो मित्र, एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे परदेशात

Nirbhaya Case : मिळणाऱ्या पैशातून मुलीचे लग्न लावणार; जाणून घ्या पवन जल्लादचा पगार

सामूहिक बलात्काराच्या रात्री गुन्हेगारांनी परिधान केलेल्या कपड्यांमध्ये पीडित महिला आणि तिच्या मित्राच्या रक्ताचे डाग सापडले होते. मुख्य आरोपी राम सिंगच्या (त्याने मार्च २०१३ ला तुरुंगात आत्महत्या केली)  चप्पलवरही पीडितेच्या रक्ताचे ठसे सापडले. दोषींनी पीडित महिला आणि तिच्या मित्राचे कपडे जाळले होते. पोलिसांनी असे अनेक पुरावे गोळा केले की ते दोषींना संपवण्यासाठी पुरेसे होते.
 

Web Title: Nirbhaya Case: The tooth marks on the body were witness to cruelty; Evidence from 10 photos pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.