शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

निमोणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी संघर्ष शिगेला

By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST

निमोणे : निमोणे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठीचा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याविषयी पंचक्रोशीत उत्सुकता आहे.

निमोणे : निमोणे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठीचा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याविषयी पंचक्रोशीत उत्सुकता आहे.
कोणत्याही पक्षाचे अथवा गटाचे एकच एक पॅनल नव्हते. प्रत्येक वॉर्डानसार उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार पॅनल तयार केले होते. असे असले तरी विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्या समर्थकांनी या निवडणुका लढविल्या. नवीन रचनेनुसार सभासद संख्या तेरा झाली. त्यापैकी एका भटक्या विमुक्त प्रवर्गातील पात्र महिला उमेदवार न मिळाल्याने ती जागा रिक्त आहे. उरलेल्या बारा जागांपैकी पाच जागी बिनविरोध तर सात जागांसाठी अटीतटीची लढाई झाली. सध्या बारा सभासद आहेत. सरपंचपद हे सर्वसाधारण स्त्री वर्गासाठी राखीव असल्याने यातील सहाही महिला या पदासाठी पात्र आहेत. यात आजी-माजी लोकप्रतिनधींचे स्थानिक समर्थक आघाडीवर असून, सरपंच आपल्याच गटाचा व्हावा यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. सध्या सर्व सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले असून, त्यांचे खंदे कार्यकर्ते मात्र बहुमताच्या जमवाजमवीसाठी साम-दाम याचा वापर करत आहेत. यातून मोठा घोडाबाजार होण्याची शक्यता आहे.