पुढील पंतप्रधान कोण होईल सांगता येत नाही; रामदेव बाबांच्या वक्तव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 11:25 IST2018-12-26T10:16:55+5:302018-12-26T11:25:42+5:30

भारत हा जातीयवादी देश नाही आणि केवळ हिंदुंचाही देश नाही, असे स्पष्ट केले. 

The next prime minister will not be able to say that; Sensation by Ramdev Baban's statement | पुढील पंतप्रधान कोण होईल सांगता येत नाही; रामदेव बाबांच्या वक्तव्याने खळबळ

पुढील पंतप्रधान कोण होईल सांगता येत नाही; रामदेव बाबांच्या वक्तव्याने खळबळ

मदुराई : देशातल राजकीय घडामोडींमध्ये रस दाखविणारे योगगुरु रामदेव बाबा यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत खळबळ उडवून दिली आहे. सध्याची राजकीय स्थितीचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. तसेच देशाचा पुढील पंतप्रधान कोण असेल यावरही भविष्यवाणी करू शकत नाही असे सांगत सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा निवडून येतील याबाबत खात्री वाटत नसल्याचे सुतोवाच केले आहे. 


मंगळवारी ते मदुराईला आले होते. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांनी काही प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी भारत हा जातीयवादी देश नाही आणि केवळ हिंदुंचाही देश नाही, असे स्पष्ट केले. 


देशातील राजकीय परिस्थिती खडतर बनली असून पुढचे पंतप्रधान कोण असतील याबाबत काहीच सांगू शकत नाही. मी राजकारणावर लक्ष केंद्रीत केलेले नाही आणि कोणाला पाठिंबाही किंवा विरोधही केलेला नाही. आम्हाला जातीयवादी किंवा हिंदूंचा देश नकोय, तर अध्यात्मिक देश हवा आहे, असेही रामदेव बाबा यांनी सांगितले. 


रामदेव बाबा यांची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा लोकसभेपासून बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसने भाजपकडून महत्वाची राज्ये हिसकावून घेतली आहेत. शिवाय मोदी सरकारमधील घटकपक्ष नाराज असल्याने साथ सोडून जात आहेत. 
 

Web Title: The next prime minister will not be able to say that; Sensation by Ramdev Baban's statement