शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्पाईसजेटची ग्राहकांना नववर्ष भेट, ७१६ रुपयांमध्ये करा विमानप्रवास

By admin | Updated: December 28, 2015 15:17 IST

'स्पाईसजेट' कंपनीने ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देण्यासाठी 'हॅपी न्यू ईयर' सेल आणला असून त्याअंतर्गत कंपनीच्या राष्ट्रीय मार्गांवर अवघ्या ७१६ रुपयांत प्रवास करता येईल.

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २८ - 'स्पाईसजेट' या विमान कंपनीने आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देण्यासाठी 'हॅपी न्यू ईयर' सेल आणला असून त्याअंतर्गत कंपनीच्या काही लोकप्रिय (राष्ट्रीय) मार्गांवर अवघ्या ७१६ रुपये भरून प्रवास करता येणार आहे. मात्र त्यात कराचा समावेश नसेल. २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत ही स्कीम सुरू असून त्याअंतर्गत प्रवासी १५ जानेवारी २०१६ ते १२ एप्रिल २०१६ पर्यंतची  बुकिंग्ज करू शकतात. मात्र ही योजना राष्ट्रीय मार्गावरील थेट उड्डाणांसाठीच लागू असेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहक 'स्पाईसजेट.कॉम', स्पाईसजेटचे मोबाईल अॅपसह सर्व ट्रॅव्हल कंपन्या, कॉल सेंटर्स आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे तिकीट बूकिंग करू शकतात. या योजनेअंतर्गत बुक करण्यात आलेली तिकीटे रद्द करण्यात आल्यास त्याचे पैसे ग्राहकांना परत मिळू शकतात व त्या तिकीटांचा कालावधीही बदलता येऊ शकतो, मात्र त्यासाठी चेज फी आकारण्यात येईल, असे कंपनीच्या निवेदनात नमूद करण्यात आले. 'प्रथम येणा-यास प्राधान्य' या तत्वानुसार ही तिकीट विक्री उपलब्ध असेल, असेही त्यात म्हटले आहे. 
दरम्यान  'स्पाईसजेट'च्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडत असून स्पाईसजेटची वेबसाईट क्रॅश झाली आहे.